ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. ९ : उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतरही पाकिस्तानच्या दिशेने होणारी घुसखोरी मात्र सुरुचं आहेत. रोजचं पाकच्या कुरापती सुरुच आहे. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. भारत कोणावरही हल्ला करत नाही, पण आमच्या देशावर हल्ला झाला तर आम्ही प्रत्युत्तर देताना गोळ्याही मोजणार नाही. राजस्थानातील पाकला लागून असलेल्या मुनाबाव बॉर्डरवर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केले. ते दोन दिवसांच्या सीमालगत भागाच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी बीएसएफच्या टॉवरमधून स्वतः पाकिस्तानी सीमेवरील हालचालींची माहिती घेतली.तसेच वारंवार दहशतवाद्यांकडून जवानांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिलाय. दुसऱ्यांची जमीन हिरावून घेण्याचा आमचा इरादाही नाही. आमची परंपरा वसुधैव कुटुंबकम ही आहे. आम्ही गोळीबार सुरु करत नाही. मात्र आमच्यावर हल्ला झाल्यास प्रत्युत्तर देताना गोळ्या मोजणार नाही, अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. अनेक अडचणींनंतरही सीमेवर तैनात राहून देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सलाम करत त्यांचे कौतुक केले. काही ठिकाणी फेन्सिंग खराब झाले असून ते रिपेयर केले जाणार असून ठरावीक वेळेनंतर त्याची पाहणी होणार असल्याचेही सांगितले.
देशावर हल्ला झाला तर प्रत्युत्तर देताना गोळ्या मोजणार नाही - गृहमंत्री
By admin | Published: October 09, 2016 11:28 AM