ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - गाय ही एक पशूच आहे, ती माता असूच शकत नाही असे विधान सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी केले आहे. गोमांस खाण्यात गैर काहीच नसून जगभरात गोमांस खाल्ले जाते असा दावाही त्यांनी केला आहे.
काशी हिंदू विद्यापीठातील एका कार्यक्रमात मार्कंडेय काटजू यांनी उपस्थितांना संबोधित केले. दादरीत गोमांस खाल्ल्यांच्या संशयावरुन एकाची हत्या झाली होती. या घटनेवर काटजू म्हणाले, दादरीतील घटना ही राजकारणातू घडलेली आहे. मला गोमांस आवडतं आणि मी ते खातोही. यात गैर काहीच नाही. काटजू यांच्या वक्तव्यावर काही विद्यार्थ्यांनी नाराजीही व्यक्त केली. या विद्यार्थ्यांनी सभागृहातच काटजूंविरोधात घोषणाबाजीही केली होती.