शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर स्वतःची घरं भरली अन् पक्ष संकटात असताना भाजपात गेले"
2
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
4
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
5
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
6
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
7
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
8
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
9
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
10
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
12
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
13
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
14
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
15
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
16
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
17
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
18
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
19
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
20
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू

दिग्विजय सिंह पराभूत झाले तर घेईन जिवंत समाधी, या संतांनी केली प्रतिज्ञा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 1:57 PM

दिग्विजय सिंह आणि साध्वी प्रज्ञा सिंह आमनेसामने असलेल्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे येथील राजकीय वातावरण अधिकाधिक तापत चालले आहे.  

भोपाळ - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध भोपाळ लोकसभा मतदारसंघात साध्वी प्रज्ञा सिंह यांना उतरवून भाजपाने कट्टर हिंदुत्वाचे कार्ड खेळले आहे. दरम्यान भोपाळमधील निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे येथील राजकीय वातावरण अधिकाधिक तापत चालले आहे.  दरम्यान, पंचायती श्रीनिरंजनी आखाढा महामंडलेश्वर श्री वैराग्यनंद गिरी महाराज यांनी दिग्विजय सिंह यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच साध्वी प्रज्ञा सिंहकडून दिग्विजय सिंह पराभूत झाल्यास जिवंत समाधी घेईन अशी, प्रतिज्ञा त्यांनी केली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी देत भाजपाने भोपाळ मतदारसंघातील निवडणुकीत कथित हिंदू दहशतवादाचा मुद्दा चर्चेत आणला आहे. दरम्यान, एकीकडे साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यामागे भाजप आणि हिंदुत्ववाद्यांती ताकद आहे. तर दिग्विजय सिंह यांनाही अनेक संत महंतांकडून समर्थन मिळत आहे. दरम्यान,  पंचायती श्रीनिरंजनी आखाढा महामंडलेश्वर श्री वैराग्यनंद गिरी महाराज यांनी दिग्विजय सिंह यांना पाठिंबा जाहीर केला आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाराज म्हणाले की, ''आज अनेकजण धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडत आहेत. येथे सनातन धर्मामध्ये फूट पाडली जात आहे. मात्र हिंदुत्वावरून राजकारण होता कामा नये. सनातन धर्मावरून राजकारण होता कामा नये. त्यामुळे देशातील संत दिग्विजय सिंह यांच्यासोबत आहेत.''

दिग्विजय सिंह यांना पाठिंबा देताना महाराजांनी मोठी प्रतिज्ञाही केली. ''येत्या 5 मे रोजी  कामाख्या मातेचा महायज्ञ करण्यात येणार आहे. या यज्ञात पाच क्विंटल मिरचीची आहुती देण्यात येईल. मात्र या यज्ञादरम्यान कुणालाही ठसका लागणार नाही. या यज्ञामुळे दिग्विजय सिंह यांचा विजय होईल. तसेच दुर्दैवाने असे झाले नाही तर मी महामंडलेश्वर श्री वैराग्यनंद गिरी महाराज त्याच ठिकाणी जिवंत समाधी घेईन, ही माझी प्रतिज्ञा आहे,''असेही महाराजांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहbhopal-pcभोपाळMadhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा