लखनौ - बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केलेल्या महाआघाडीमुळे उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुका झाल्यास उत्तर प्रदेशात भाजपाची दाणादाण उडण्याची शक्यता असून, राज्यातील 90 जागांपैकी भाजपाला केवळ 25 जागा मिळतील तर सपा-बसपा यांच्या आघाडीला 51 जागा मिळतील असा अंदाज एबीपी न्यूज-सी व्होटरच्या सर्वेमध्ये वर्तवण्यात आला आहे. या सर्वेनुसार काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला 4 जागा मिळण्याची शक्यता आहे.एबीपी न्यूज-सी व्होटरच्या सर्वेनुसार उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल विभागातील 21 जागांपैकी भाजपाला 6 तर सपा-बसपा आघाडीला 15 जागा मिळतील. मात्र या विभागात काँग्रेसला एकही जागा मिळण्याची शक्यता नाही. अवध विभागात 18 जागांपैकी भाजपाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागेल. तर सपा-बसपाला 13 आणि काँग्रेसला दोन जागा मिळतील.पश्चिम उत्तर प्रदेशमध्येही सपा-बसपा आघाडीचाच जोर दिसून येण्याची शक्यता आहे. येथील 26 जागांपैकी भाजपाला केवळ 10 तर सपा आणि बसपाला 15 जागा मिळतील. या प्रदेशाता काँग्रेसच्या खात्यातही एक जागा जाण्याची शक्यता आहे. तर बुंदेलखंड विभागातील 15 जागांपैकी भाजपाल 6, सपा-बसपा आघाडीला 8 आणि काँग्रेसला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये एनडीएचीच बाजीएकीकडे उत्तर प्रदेशात भाजपाला जबर नुकसान होत असताना बिहारमध्ये मात्र एनडीएला मोठा विजय मिळण्याची शक्यता या सर्व्हेमधून वर्तवण्यात आली आहे. बिहारमधील 40 जागांपैकी एनडीएला 35 तर यूपीएला केवळ 5 जागा मिळण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये एनडीएमध्ये भाजपा, नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल आणि रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीचा समावेश आहे.
आज निवडणुका झाल्यास उत्तर प्रदेशात भाजपाची उडणार दाणादाण, मिळतील केवळ एवढ्या जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 5:57 PM