देशात आज निवडणूक झाली तर...; भाजपला किती जागा, काँग्रेसचं काय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 06:25 AM2023-04-23T06:25:12+5:302023-04-23T06:28:24+5:30
पुन्हा दिसणार मोदी मॅजिक : भाजपला २९२ ते ३३८, तर काँग्रेसला मिळतील १०६ ते १४४ जागा
नवी दिल्ली : आज लोकसभा निवडणूक झाली तर कोणाचे वर्चस्व असेल? भाजप की काँग्रेस की विरोधी एकजूट? बाजी कोण मारणार? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे टाइम्स नाऊ नवभारत आणि ईटीजी रिसर्चच्या सर्वेक्षणातून समोर आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा जिंकणार असल्याचे सर्वेक्षणात दिसून येत आहे. मोदी सरकार २.० च्या कामकाजावर किती समाधानी आहेत, असा सवाल केला असता ५१ टक्के लोकांनी पूर्णपणे समाधानी असल्याचे सांगितले. १६ टक्के लोकांनी बऱ्याच प्रमाणात, तर १२ टक्के लोकांनी सरासरी समाधानी असल्याचे सांगितले. २१ टक्के लोकांनी समाधानी नसल्याचे सांगितले.
लोकांना वाटते, भ्रष्टाचारी झाले सैरभैर
भ्रष्टाचारावरील कारवाईवरून जे राजकारण होत आहे त्याकडे कसे पाहता, असा सवाल करण्यात आला तेव्हा ३० टक्के लोकांनी सांगितले की, हे अर्थ नसलेले राजकारण आहे. ३२ टक्के लोकांना वाटते की, भ्रष्टाचारी लोक सैरभैर झाले आहेत. १४ टक्के लोकांना वाटते की, हा राजकीय दबावाचा प्रयत्न आहे. २४ टक्के लोकांनी सांगितले की, यावर बोलू इच्छित नाही.
आज निवडणूक झाली
तर कोणाला किती जागा?
भाजप २९२ ते ३३८
काँग्रेस १०६ ते १४४
टीएमसी २० ते २२
इतर ६६ ते ९६
भारत जोडो यात्रेचा राहुल गांधी यांना फायदा?
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे त्यांच्या राजकीय आकलनात फरक पडला आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. ३० टक्के लोकांनी सांगितले की, यामुळे फरक पडला आहे. तर, २२ टक्के लोकांचे म्हणणे आहे की, जे त्यांनी कमविले ते लंडन दौऱ्यात गमविले. २५ टक्के लोकांना वाटते की, राहुल गांधी योग्य मार्गावर आहेत.
विरोधकांचा चेहरा कोण?
राहुल गांधी २९%
ममता बॅनर्जी १३%
केजरीवाल १९%
केसीआर ७%
नितीशकुमार ८%
इतर कोणी २४%
लोकप्रिय चेहरा कोणाचा?
नरेंद्र मोदी
६४%
राहुल गांधी
१३%
नितीशकुमार
६%
केसीआर
५%
अरविंद केजरीवाल
१२ %
२०२४ मध्ये भाजपला किती जागा?
३००+ जागा मिळतील ४२%
३०० जागा जिंकणे कठीण २६%
निवडणुकीवेळी स्पष्ट होईल १९%
काही सांगू शकत नाही १३%
सरकारचे मोठे यश काय?
कोरोनाचा सामना २६%
कलम ३७० हटवणे ९%
राम मंदिराचा मुद्दा २९%
जनकल्याणाच्या योजना १७%
भ्रष्टाचाराविरुद्धची १९%