आज निवडणुका झाल्यास उत्तर प्रदेशात भाजपा बंपर जागा जिंकणार, सपा, बसपा, काँग्रेस एकत्र लढले तरी निष्प्रभ ठरणार, धक्कादायक सर्व्हे 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 10:50 PM2023-03-26T22:50:20+5:302023-03-26T22:51:05+5:30

Uttar Pradesh Politics: आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास भाजपा आधीचे सर्व रेकॉर्ड मोडून बंपर विजय मिळवणार असा अंदाज सर्व्हेमधून वर्तवण्यात आला आहे. 

If elections are held today, BJP will win bumper seats in Uttar Pradesh, even if SP, BSP, Congress fight together, it will be ineffective, shocking survey | आज निवडणुका झाल्यास उत्तर प्रदेशात भाजपा बंपर जागा जिंकणार, सपा, बसपा, काँग्रेस एकत्र लढले तरी निष्प्रभ ठरणार, धक्कादायक सर्व्हे 

आज निवडणुका झाल्यास उत्तर प्रदेशात भाजपा बंपर जागा जिंकणार, सपा, बसपा, काँग्रेस एकत्र लढले तरी निष्प्रभ ठरणार, धक्कादायक सर्व्हे 

googlenewsNext

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा उदय झाल्यापासून उत्तर प्रदेश हा भाजपाचा बालेकिल्ला बनलेला आहे. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुका आणि २०१७ आणि २०२२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपानेउत्तर प्रदेशात मोठ्या विजयांची नोंद केली होती. दरम्यान, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास भाजपा आधीचे सर्व रेकॉर्ड मोडून बंपर विजय मिळवणार असा अंदाज एबीपी न्यूजसाठी Matrize यांनी नुकत्याच केलेल्या सर्व्हेमधून वर्तवण्यात आला आहे. 

या सर्व्हेनुसार उत्तर प्रदेशमध्ये आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास भाजपाला २०१४ आणि २०१९ च्या विजयाची पुनरावृत्ती करण्याची शक्यता आहे. त्यामध्ये भाजपाला ८० पैकी ६७ ते ७३ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर सपा आघाडीला. ३ ते ६, बीएसपीला ० ते ४ आणि काँग्रेसला १ ते २ जागा मिळण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे उत्तर प्रदेशात भाजपाला तब्बल ६३ टक्के मते मिळतील असा अंदाज या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर सपा आघाडीला १९ टक्के, बीएसपीला ११ टक्के, काँग्रेसला ४ टक्के आणि इतरांच्या खात्यात ३ टक्के मते जातील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भाजपा विरोधात सर्व पक्ष एकत्र लढले तरी ते निष्प्रभ ठरण्याची शक्यता आहे.

हा सर्व्हे उत्तर प्रदेशमधील सर्व ४०३ विधानसभा मतदारसंघात ७ ते २२ मार्चदरम्यान करण्यात आला. त्यामध्ये ८० हजार ६०० लोकांचं मत जाणून घेण्यात आलं. दरम्यान, २०१९ मध्ये उत्तर प्रदेशमधील ८० जागांपैकी ६४ जागांवर भाजपाने विजय मिळवला होता. तर बसपाने १०, सपाने ५ आणि काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला होता. त्यावेळी भाजपाला ४३.८ टक्के, सपाला ३६.७ टक्के आणि बसपाला १२.९ टक्के मते मिळाली होती. तर काँग्रेसच्या खात्यात २.३ टक्के मते गेली होती.  

Web Title: If elections are held today, BJP will win bumper seats in Uttar Pradesh, even if SP, BSP, Congress fight together, it will be ineffective, shocking survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.