Opinion Polls: आज निवडणूक झाल्यास मोदी सर्व रेकॉर्ड मोडणार, भाजपा एवढ्या जागा जिंकणार, ओपिनियन पोलचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 07:18 PM2022-07-29T19:18:12+5:302022-07-29T19:19:34+5:30

Opinion Polls: मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाची तीन वर्षे पूर्ण झाल्याने आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वेध राजकीय पक्षांना लागले आहेत. दरम्यान, आज लोकसभेची निवडणूक झाल्यास मोदी पुन्हा आपल्या नेतृत्वाची कमाल दाखवणार का? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

If elections are held today, Modi will break all records, BJP will win so many seats, according to opinion polls | Opinion Polls: आज निवडणूक झाल्यास मोदी सर्व रेकॉर्ड मोडणार, भाजपा एवढ्या जागा जिंकणार, ओपिनियन पोलचा अंदाज

Opinion Polls: आज निवडणूक झाल्यास मोदी सर्व रेकॉर्ड मोडणार, भाजपा एवढ्या जागा जिंकणार, ओपिनियन पोलचा अंदाज

Next

नवी दिल्ली - मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाची तीन वर्षे पूर्ण झाल्याने आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वेध राजकीय पक्षांना लागले आहेत. दरम्यान, आज लोकसभेची निवडणूक झाल्यास मोदी पुन्हा आपल्या नेतृत्वाची कमाल दाखवणार का? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. दरम्यान, इंडिया टीव्ही-मॅटराईजच्या सर्वेमधून सर्व राजकीय अंदाजांना धक्का देणारी आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा आज निवडणुका झाल्यास सर्व रेकॉर्ड ब्रेक करण्याची शक्यता आहे. या ओपिनियन पोलनुसार आज निवडणुका झाल्यास भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला ३६२ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला ९७ जागांवर समाधान मानावे लागू शकते. तर इतरांना ८४ जागा मिळण्याची शक्यता आहे.

आज लोकसभेची निवडणूक झाल्यास देशाचा कौल काय असेल हे जाणून घेण्यासाठी इंडिया टीव्ही-मॅटराईजने एक सर्वे केला होता. या सर्वेनुसार आज लोकसभेची निवडणूक झाल्यास मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा पुन्हा एकदा बहुमत मिळवून केंद्रातील सत्ता मिळवू शकतो. उल्लेखनीय बाब म्हणजे भजपाला या निवडणुकीत २०१९ पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. तर देशात सत्तापरिवर्तनासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेसला सलग तिसऱ्या निवडणुकीत तीन आकडी जागा जिंकण्यात अपयश येण्याची शक्यता आहे.

या ओपिनियन पोलनुसार उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आदी देशातील मोठ्या राज्यांमध्ये भाजपाला लक्षणीय यश मिळण्याची शक्यता आहे. तर दक्षिणेतील केरळ आणि तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि यूपीएची कामगिरी लक्षणीय राहण्याची शक्यता आहे. तर पंजाबमध्ये आप आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आपले वर्चस्व राखतील, असा अंदाज आहे.

भाजपासाठी सर्वात महत्त्वाचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला २०१४ पेक्षा मोठा विजय मिळण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात भाजपाला ८० पैकी ७६ जागा मिळतील, असा अंदाज या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे. तर राजकीय उलथापालथीमुळे चर्चेत असलेल्या महाराष्ट्रामध्ये भाजपाला ४८ पैकी २६ जागा मिळतील. तर शिवसेनेत वेगळा गट स्थापन करणाऱ्या शिंदे गटाला ११ जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला ६, काँग्रेसला २ तर शिवसेनेला ३ जागा मिळण्याची शक्यता आहे. 

Web Title: If elections are held today, Modi will break all records, BJP will win so many seats, according to opinion polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.