नवी दिल्ली : पठाणकोट हवाई तळावरील अतिरेकी हल्ल्यामागे कुणी ‘घरभेदी’ आहे का, हे शोधण्यासाठी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेकडून(एनआयए) भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) काही कर्मचाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. पंजाबातील भारत-पाक सीमेनजिक सुमारे २ हजार एकरावर पसरलेल्या या हवाई तळावर हवाई दलाचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय असे सुमारे ५ हजार लोक राहतात. त्यामुळे तूर्तास तरी या हल्ल्यामागे अतिरेक्यांना मदत करणारा कुणी घरभेदी असल्याची शक्यता पूर्णपणे नाकारणे शक्य नाही, असेही हा अधिकारी म्हणाला.
आयएएफ कर्मचाऱ्यांची चौकशी?
By admin | Published: February 04, 2016 3:07 AM