'नवज्योतसिंग सिद्धू अमरिंदर यांना कॅप्टन मानत नाहीत, मग राजीनामा द्यावा'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 09:21 AM2018-12-02T09:21:44+5:302018-12-02T13:09:06+5:30

पंजाबचे कॅबिनेट मंत्री तृप्त राजेंद्र सिंग बजवा यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याची माणी केली आहे.

If he doesn't recognize captain Amarinder Singh as his captain then Navjot Singh Sidhu should resign -TR Bajwa,Punjab Minister | 'नवज्योतसिंग सिद्धू अमरिंदर यांना कॅप्टन मानत नाहीत, मग राजीनामा द्यावा'

'नवज्योतसिंग सिद्धू अमरिंदर यांना कॅप्टन मानत नाहीत, मग राजीनामा द्यावा'

Next
ठळक मुद्देनवज्योतसिंग सिद्धूंनी राजीनामा द्यावा - तृप्त राजेंद्र सिंग बजवापंजाबचे कॅप्टन अमरिंदर सिंग - तृप्त राजेंद्र सिंग बजवासिद्धूंनी बोलताना काळजीपूर्वक विधान करावं - तृप्त राजेंद्र सिंग बजवा

नवी दिल्ली - पंजाबचे कॅबिनेट मंत्री तृप्त राजेंद्र सिंग बजवा यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याची माणी केली आहे. अमरिंदर सिंग हे माजी लष्कर कॅप्टन आहेत. याचा संदर्भ घेऊन सिद्धू यांनी म्हटले होते की, राहुल गांधी हेच माझे कॅप्टन आहेत. यावरुन तृप्त राजेंद्र सिंग बजवा यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी करत म्हटले की, सिद्धू हे अमरिंदर यांना कॅप्टन समजत नसतील, तर त्यांनी नैतिक जबाबदारीनुसार मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा. 

(राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून पाकिस्तानला गेलो नव्हतो -सिद्धू)

दरम्यान,  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्याला पाकिस्तानला पाठविलेले नव्हते, असे नवे स्पष्टीकरण नवज्योतसिंग सिद्धू यांनी शनिवारी दिले आणि आधीच्या आपल्या वक्तव्यावरून त्यांनी घूमजाव केले. करतारपूर कॉरिडॉरच्या पायाभरणी समारंभाला हजेरी लावण्यासाठी सिद्धू पाकिस्तानला गेल्याने वाद निर्माण झाला आहे. पण ‘राहुल गांधी यांनीच आपल्याला पाकिस्तानला जायला सांगितले होते, असा दावा सिद्धू यांनी केला होता. त्यावरून नवा वाद निर्माण होताच, सिद्धू यांनी घूमजाव केले.



 




 

(खलिस्तानी दहशतवाद्यासोबत नवज्योतसिंग सिद्धूचा फोटो, विरोधकांकडून टीका


 

 

Web Title: If he doesn't recognize captain Amarinder Singh as his captain then Navjot Singh Sidhu should resign -TR Bajwa,Punjab Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.