नवी दिल्ली - देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. वाढत्या बेरोजगारीवरून सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विरोधक या मुद्दावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहे. भाजपनेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दावा केला होता की, नोटांवर लक्ष्मीचा फोटो छापाल्यावर अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल. त्यावर काँग्रेसने खोचक प्रश्न उपस्थित केला आहे.
काँग्रेस नेते मनू सिंघवी यांनी स्वामी यांच्या ट्विटला खोचक प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मला वाटलं होतं देशातील अर्थतज्ज्ञ अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे काम करतील, मात्र ते नोटा बदलण्याचा सल्ला देत आहेत. माता लक्ष्मीने अर्थव्यवस्था वाचविण्याचे काम केले तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन काय करणार असा सवाल सिंघवी यांनी उपस्थित केला आहे.
स्वामी म्हणाले होती की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर उत्तर द्यावे. मी या गोष्टीच्या बाजुने आहे. भगवान गणेश आलेली संकटे दूर करतात. तर माता लक्ष्मी धनाची देवी आहे. भारतीय चलनावर लक्ष्मीचा फोटो छापल्यास, अर्थव्यवस्थेला लाभ होऊ शकतो. यावर कोणीही वाईट वाटून घेऊ नये, असंही सुब्रमण्याम स्वामी यांनी म्हटले आहे.
इंडोनेशियाच्या चलनावर गणपतीचा फोटो आहे. त्याचा त्यांना फायदा होत आहे. अशा स्थितीत भारताने देखील अशी काही तरी उपाययोजना करावी, असंही स्वामी यांनी म्हटले आहे. वास्तविक पाहता स्वामी हे अर्थतज्ज्ञ आहेत. मात्र त्यांनीच असा सल्ला दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त कऱण्यात येत आहे.