मुठभर उद्योगपतींची कर्जे माफ होत असतील तर शेतकऱ्यांनाही कर्जमाफी द्यावी लागेल - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 04:46 PM2018-11-30T16:46:00+5:302018-11-30T16:47:52+5:30
शेतीतील विविध समस्यांचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी राजधानीत पोहोचलेल्या शेतकऱ्यांना संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली.
नवी दिल्ली - शेतीतील विविध समस्यांचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी राजधानीत पोहोचलेल्या शेतकऱ्यांना संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 15 निकटवर्तीय मित्रांची कर्जे माफ करू शकतात, तर मग देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांची कर्जेही त्यांनी माफ केली पाहिजेत, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी उपस्थित होते.
राहुल गांधी यांनी आज दुपारी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर येथे आलेल्या हजारो शेतकऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंबानी आणि अदानी यांच्यात देश वाटून टाकला आहे. जर 15 धनाढ्य लोकांचे कर्ज माफ होत असेल, तर देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांचेही कर्ज माफ झाले पाहिजे. शेतकरी तुमच्याकडे कुठलीही फुकटची भेट मागत नाही आहेत. ते आपला हक्क मागत आहेत. मोदींनी हमीभाव, विमा आदींबाबत आश्वासने दिली होती. मात्र आता ते केवळ पोकळ भाषणे देत आहेत.''
Rahul Gandhi at farmers’ protest in Delhi: If the loans of industrialists can be waived off, then the debt of farmers must be waived off as well. I assure the farmers of India, we are with you, don't feel afraid. Aapki shakti ne is desh ko banaya hai pic.twitter.com/r8Lzew4Ay0
— ANI (@ANI) November 30, 2018
यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. मोदींच्या काळात सीमेवर जवान आणि देशात शेतकरी दु:खी आहे. आता सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू न केल्यास हे सरकारविरोधात कहर करतील, असे केजरीवाल म्हणाले.
Arvind Kejriwal at farmers’ protest in Delhi: Five months are left, I demand that the Central Govt implement Swaminathan report. Warna 2019 mein ye kisaan qayamat dha denge pic.twitter.com/wkTyPJgA1n
— ANI (@ANI) November 30, 2018
देशाच्या कानाकोपऱ्यातून रामलीला मैदानावर आलेले शेतकरी मोर्चात सहभागी झाले आहेत. या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, राष्ट्रीय किसान मजदूर संघटना, किसान एकता संघटना, भारतीय किसान युनियन अशा 208 संघटनांचे सदस्य शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, सरकार शेतकऱ्यांचे हित पाहत नाही. साखर कारखाने ठरल्याप्रमाणे पैसे देत नाहीत. उत्पादन खर्च वाढला आहे. कृषी संकटामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत, असा आक्रोश शेतकरी संघटनांचा आहे.
Opposition leaders including Rahul Gandhi, Arvind Kejriwal and Farooq Abdullah at farmers protest in Delhi pic.twitter.com/ThHeMKGrpm
— ANI (@ANI) November 30, 2018
शेतकऱ्यांच्या मोर्चाला समर्थन देण्यासाठी दिल्लीतील डॉक्टर, वकील, प्राध्यापक, कलाकार मोठ्या संख्येने पुढे आले आहेत. नेशन फॉर फार्मरच्या सहाशे ते सातशे स्वयंसेवकांनी शेतकऱ्यांना साथ देत रामलीला मैदानाच्या दिशेने पायी कूच केली. यातील काही डॉक्टरांनी शेतकऱ्यांसाठी मैदानावर आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित केले आहे.