नवी दिल्ली - शेतीतील विविध समस्यांचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी राजधानीत पोहोचलेल्या शेतकऱ्यांना संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 15 निकटवर्तीय मित्रांची कर्जे माफ करू शकतात, तर मग देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांची कर्जेही त्यांनी माफ केली पाहिजेत, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी उपस्थित होते. राहुल गांधी यांनी आज दुपारी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर येथे आलेल्या हजारो शेतकऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंबानी आणि अदानी यांच्यात देश वाटून टाकला आहे. जर 15 धनाढ्य लोकांचे कर्ज माफ होत असेल, तर देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांचेही कर्ज माफ झाले पाहिजे. शेतकरी तुमच्याकडे कुठलीही फुकटची भेट मागत नाही आहेत. ते आपला हक्क मागत आहेत. मोदींनी हमीभाव, विमा आदींबाबत आश्वासने दिली होती. मात्र आता ते केवळ पोकळ भाषणे देत आहेत.''
मुठभर उद्योगपतींची कर्जे माफ होत असतील तर शेतकऱ्यांनाही कर्जमाफी द्यावी लागेल - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 4:46 PM
शेतीतील विविध समस्यांचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी राजधानीत पोहोचलेल्या शेतकऱ्यांना संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली.
ठळक मुद्देशेतीतील विविध समस्यांचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी राजधानीत पोहोचलेल्या शेतकऱ्यांना संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केलीजर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 15 निकटवर्तीय मित्रांची कर्जे माफ करू शकतात, तर मग देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांची कर्जेही त्यांनी माफ केली पाहिजेतदेशाच्या कानाकोपऱ्यातून रामलीला मैदानावर आलेले शेतकरी मोर्चात सहभागी झाले आहेत. या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, राष्ट्रीय किसान मजदूर संघटना, किसान एकता संघटना, भारतीय किसान युनियन अशा 208 संघटनांचे सदस्य शेतकऱ्यांचा समावेश आहे.