एका महिलेच्या दोन लग्नांनंतर जन्मलेल्या अपत्यांमध्ये वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीबाबत गुजरातमधील उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. हिंदू उत्तराधिकार अधिनियममधील तरतूद १५ नुसार मृत्यूपत्र न बनविता एखाद्या विधवा महिलेचा मृत्यू झाला तर तिची अधिकृत किंवा अवैध संबंधांतून जन्माला आलेल्या अपत्यांना तिच्या वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मिळतो.
न्यायमूर्ती एपी ठाकर यांनी निकाल देताना सांगितले की, या प्रकरणात मृतक महिला ही मालमत्तेच्या मालकांपैकी एक होती. यामुळे तिला तिचा वाटा कोणलाही देण्याचा पूर्ण अधिकार होता. एका हिंदू विधवेला तिच्या दुसऱ्या पतीपासून जमीन मिळू शकते. एवढेच नाही तर तिचे पहिल्या पतीपासूनचे अपत्य या संपत्तीमध्ये वारस होऊ शकते.
कलेक्टरांनी दिलेल्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. संपत्तीचे मूळ मालक माखनभाई पटेल होते. त्यांनी आपल्या दोन मुलांसह पत्नी कुंवरबेन यांना संपत्तीचा वारस बनविले होते. 1982 च्या महसूलमध्येही नोंद होती. यानंतर कुंवरबेन यांनी त्यांच्या आधीच्या पतीपासून जन्मलेल्या मुलाच्या नावे माखनभाईंकडून वाट्याला आलेली संपत्ती मृत्यूपत्राद्वारे दिली. कुंवरबेन यांच्या मृत्यूनंतर संपत्तीवर त्यांच्या सुनेने दावा केला.
हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 च्या कलम 15 नुसार, एखाद्या हिंदू महिलेचा मृत्यू झाल्यास, तिची मालमत्ता तिच्या इच्छेनुसार खालील व्यक्तींना मिळू शकते:1. मुलगा, मुलगी आणि पती2. पतीचे वारस3. आई आणि वडील4. वडिलांचे वारस5. आईचे वारस