जातीय सलोख्याची बैठक घेतली असती तर...
By admin | Published: April 05, 2016 12:14 AM
हुडको परिसरात यापूर्वीही क्षुल्लक कारणावरून वाद झालेले आहेत. परंतु त्या-त्या वेळी तत्कालीन पोलीस अधिकार्यांनी जातीय सलोख्याच्या बैठका घेऊन सामंजस्य घडवून आणले होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हुडकोत जातीय सलोख्याची बैठक झालेली नाही. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण झाली आहे. कोणत्याही कारणावरून हुडको पेटू शकते, या गोष्टीची पूर्वकल्पना येथील काही सुज्ञ नागरिकांनी पोलीस प्रशासनाला दिलीही होती. आगामी काळात येणारे सण, उत्सव लक्षात घेता जातीय सलोख्याची बैठक घेण्याची विनंती करूनही ही बैठक घेण्यात आली नाही, असाही आरोप स्थानिकांनी केला.
हुडको परिसरात यापूर्वीही क्षुल्लक कारणावरून वाद झालेले आहेत. परंतु त्या-त्या वेळी तत्कालीन पोलीस अधिकार्यांनी जातीय सलोख्याच्या बैठका घेऊन सामंजस्य घडवून आणले होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हुडकोत जातीय सलोख्याची बैठक झालेली नाही. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण झाली आहे. कोणत्याही कारणावरून हुडको पेटू शकते, या गोष्टीची पूर्वकल्पना येथील काही सुज्ञ नागरिकांनी पोलीस प्रशासनाला दिलीही होती. आगामी काळात येणारे सण, उत्सव लक्षात घेता जातीय सलोख्याची बैठक घेण्याची विनंती करूनही ही बैठक घेण्यात आली नाही, असाही आरोप स्थानिकांनी केला.तीन दंगा नियंत्रक पथके तैनातरात्री पुन्हा दंगल उसळू नये, यासाठी हुडकोत तीन दंगा नियंत्रक पथके (ट्रायकिंग फोर्स) तैनात करण्यात आली आहेत. रात्री उशिरापर्यंत पोलीस प्रशासनाकडून पेट्रोलिंग सुरू होती. पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षक हे वरिष्ठ अधिकारी उशिरापर्यंत हुडकोत तळ ठोकून होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी दोन्ही बाजूच्या फिर्यादी दाखल करून घेण्यासाठी तक्रारदारांना रामानंद पोलीस ठाण्यात नेले होते. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.कोट.........हुडकोत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून तीन दंगा नियंत्रक पथके तैनात केली आहे. दंगलप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे. कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कडक कारवाई केली जाईल.-डॉ.जालिंदर सुपेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक