मोदींनी तर Covaxin घेतली होती, त्यांना अमेरिकेला जाण्याची परवानगी कशी मिळाली?; कांग्रेसचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 12:19 PM2021-09-24T12:19:01+5:302021-09-24T12:31:16+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतील प्रवेशावर काँग्रेसकडून प्रश्नचिन्ह. यादीत समाविष्ट नसलेली लस घेतल्यानंतरही परवानगी कशी दिली, काँग्रेसचा सवाल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी Covaxin या लसीचे दोन डोस घेतले होते. दरम्यान, आता ते अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. मोदींना कोवॅक्सिनचा डोस दिल्यानंतरही अमेरिकेत प्रवेशाची परवानगी कशी देण्यात आली यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. अमेरिकेनं आपल्या लसींच्या यादीत कोवॅक्सिनचा समावेश केलेला नाही. असं अताना पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना प्रवेश कसा देण्यात आला? असा सवाल दिग्विजय सिंह यांनी केला.
"मला जर योग्यरित्या लक्षात असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Covaxin लसीचा डोस घेतला होता. याला अमेरिकेनं अद्याप मंजुरी दिलेली नाही. अथवा त्यांनी याशिवाय कोणती दुसरी लस घेतली आहे ज्याला अमेरिकनं प्रशासनानं सूट दिली आहे? देशााला हे जाणून घ्यायचं आहे," असं दिग्विजय सिंह म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर सवाल केले आहेत.
If I remember correctly Modi Ji took Covaxin which is not yet approved in US. Or he has taken some other vaccine also or has he been exempted by US Administration?
— digvijaya singh (@digvijaya_28) September 24, 2021
Nation would like to know.
दिग्विजय सिंह यांच्याशिवाय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा याचे सुपुत्र निखिल अल्वा यांनीदेखील यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. "आपल्या पंतप्रधानांप्रमाणेच मीदेखील स्वदेशी कोवॅक्सिनचा डोस घेतला आहे. परंतु आता मी इराण, नेपाळ आणि काही अन्य देश सोडून जगाच्या बहुतांश भागात जाऊ शकत नाही. परंतु नरेंद्र मोदी यांना अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली हे जाणून घेऊन मी हैराण आहे. अमेरिकेनं अद्याप कोवॅक्सिनला मंजुरी दिली नाही. अशात त्यांनी कोणती लस घेतली हा प्रश्न उपस्थित होतो," असं ते म्हणाले.
Like our PM, I too got jabbed with our Atamnirbhar COVAXIN. Now other than Iran & Nepal and a handful more, I can’t travel anywhere in the world. Which is why I’m perplexed to hear that our PM is off to the USA, that doesn’t recognise COVAXIN. So which vaccine did he really take? pic.twitter.com/6Y1JpRuraR
— Nikhil Alva (@njalva) September 22, 2021
१ मार्चला घेतली होती लस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मार्च रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिंबंधात्मक लस घेतली होती. त्यांनी स्वदेशी कोवॅक्सिन या लसीचा डोस घेतला होता. अद्याप कोवॅक्सिनला अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलियासह अनेक मोठ्या देशांनी मंजुरी दिलेली नाही. परंतु या देशांनी लसीच्या यादीत कोविशिल्डचा (Covishield) समावेश केला आहे.