नवी दिल्ली : दिल्लीचे खासदार गौतम गंभीर निवडून येण्याआधीपासूनच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. दिल्लीमध्ये प्रदूषणाबाबतची महत्वाची बैठक असताना गंभीर अनुपस्थित राहिल्याने सोशल मिडीयावर कमालीचे ट्रोल झाले होते. यावर त्यांना खुलासाही द्यावा लागला होता.
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू व भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांनी दिल्ली प्रदुषण संर्दभातील बैठकीला दांडी मारल्याने त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत होते. मात्र मला शिव्या देऊन दिल्लीतील प्रदूषण कमी होत असे तर मला हव्या तेवढ्या शिव्या द्या असं म्हणत ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना गंभीरने ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले होते.
दिल्लीतील हवेचा प्रदुषणाचा स्तर दिवसेंदिवस विषारी होत चालला आहे. यासाठी दिल्ली सरकारने राज्याचे सर्व खासदार व एमसीडी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र गौतम गंभीरभारत विरुद्ध बांगलादेशच्या कसोटी साम्यात समालोचनची भूमिका निभावतो आहे. याच दरम्यान भारतीय संघाचा माजी क्रिकेटर व्ही व्ही एस लक्ष्मण आणि निवेदक जतिन सप्रू यांच्यासोबत इंदूरमध्ये जिलेबीवर ताव मारतानाचा गंभीरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याला ट्रोल करण्यात आले होते.
यावर गंभीरने माझ्या जिलेबी खाण्याने जर दिल्लीचे प्रदूषण वाढत होत असेल तर मी जिलेबी खाणे सोडून देईन, असा खिल्लीवजा इशाराच टीकाकारांना दिला आहे. तसेच फोटो टाकल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांतच ट्रोल करायला सुरूवात केली. जर एवढी मेहनत दिल्लीच्या प्रदूषणावर काम करण्यासाठी घेतली असती तर आम्ही शुद्ध हवेत श्वास घेऊ शकलो असतो, असा टोलाही त्याने ट्रोल करणाऱ्यांना लगावला आहे.
यावर गंभीरने खुलासाही केला आहे.