जळगाव - १९६५ च्या युध्दाचे श्रेय हे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना तर १९७१ च्या युध्दाचे श्रेय हे इंदिरा गांधी यांना जर दिले जात असेल तर सर्जिकल व एअर स्ट्राईकचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यास काहीच चुकीचे नाही, असे मत सैन्याचे निवृत्त मेजर जनरल जी.डी.बक्षी यांनी व्यक्त केले.
एका कार्यक्रमानिमित्त बक्षी हे शुक्रवारी शहरात आले होते. यावेळी जळगाव जनता बॅँकेच्या सभागृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सर्जिकल स्ट्राईक असो वा युध्द या सर्व कारवाईसाठी पंतप्रधानांकडूनच परवानगी दिली जाते. त्यामुळे ही कारवाई करण्यासाठी हिंमत दाखविणाºया कोणत्याही शासनाला श्रेय हे नक्कीच दिले पाहिंजे. राफेलमध्ये नोकरशाह व काही राजकारण्यांना यामध्ये पैसा मिळाला नाही म्हणून राफेलचा वाद निर्माण केला जात आहे. हा वाद पाकिस्तान व चीन सारख्या शत्रू देशांसाठी लाभदायक ठरत असल्याचे ते म्हणाले.