NDA चा पराभव झाला तर ट्रम्प प्रमाणे तेही...; लोकसभा निवडणुकीपूर्वी केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 09:50 AM2024-01-31T09:50:58+5:302024-01-31T09:51:06+5:30
चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत महापौरांसह सर्व पदांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आल्यानंतर आणि काँग्रेस-आप आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांची ही प्रतिक्रिया आली आहे.
चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपने गुंडगिरी आणि बेईमानी केली आहे. असा दिवस ‘लोकशाहीसाठी काळा दिवस आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मंगलवारी केला. एवढेच नाही तर, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत NDA चा पराभव झाला, तर ते (भाजप) ट्रम्प यांच्या प्रमाणे (अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प) खुर्ची सोडणार नाही. ते कुठल्याही थराला जाऊ शकतात, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. ते माध्यमांसोबत बोलत होते.
चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत महापौरांसह सर्व पदांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आल्यानंतर आणि काँग्रेस-आप आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांची ही प्रतिक्रिया आली आहे. तसेच, चंदीगडच्या महापौर निवडणुकीत काय घडले, हे संपूर्ण देशाने बघितले, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.
"हा लोकशाहीसाठी काळा दिवस" -
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा 2020 च्या राष्ट्रपीत पदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानतंरच्या घटनाक्रमाचा उल्लेख करत केजरीवाल म्हणाले, भाजपवाले लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यास कुठल्याही थराला जाऊ शकतात. तसेच, लोकशाहीसाठी हा काळा दिवस आहे. सर्वांनी पाहिले की, त्यांनी कशाप्रकारे मते चोरली आणि आपले उमेदवार जिंकूण आणले. मेअर कोण झाले हा मुद्दा नाही, पण देश आणि लोकशाही हारायला नको. मेअर येतात आणि जातात. पक्षही येतात आणि जातात.''
चंडीगढ़ मेयर चुनाव में दिन दहाड़े बेईमानी करके भाजपा को जिता दिया गया। देश के लोकतंत्र के लिए ये गुंडागर्दी बेहद ख़तरनाक है। https://t.co/dKfJcoEdeM
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 30, 2024
'AAP-Congress ला होतं स्पष्ट बहुमत' -
केजरीवाल म्हणाले, जर लोकांनी एकत्रित येऊन ही गुंडगिरी थांबली नाही, तर हे देशासाठी अत्यंत घातक ठरेल. आप-काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले होते आणि ही थेट निवडणूक होती. 8 मते अथवा एकूण मतांपैकी 25 टक्के मते अवैध ठरविण्यात आली. ही कुठल्या प्रकारची निवडणूक होती? महापौरपदाच्या निवडणूक निकालावरून समजते की, काहीतरी गडबड आहे. ते राष्ट्रीय पातळीवरच्या निवडणुकीतही कुठल्यही थराला जाऊ शकतात.
आज चंडीगढ़ मेयर चुनाव में वोट टैम्परिंग का पूरा वीडियो…
आज मेयर के चुनाव में तो ये लोग रंगे हाथों पकड़े गए, ये वीडियो सामने आ गया। अभी तक देश में ना जाने कितने चुनावों में इन्होंने इस क़िस्म के फ़र्ज़ीवाड़े किए होंगे, ना जाने कितने चुनाव इस तरह बेईमानी से जीते होंगे? pic.twitter.com/KXTBG43zeQ— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 30, 2024
VIDEO केला शेअर -
अरविंद केजरीवाल यांनी महापौर पदाशी संबंधित एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. एक्सवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बॅलेट पेपरवर स्वाक्षरी करताना दिसत आहे. साधारणपणे 6 मिनिटांच्या या व्हिडिओच्या माध्यमाने हा निवडणुकीत गडबड केल्याचा प्राकार असल्याचा आरोपही अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.