कोविड-१९ मधून बरे झालेल्या पुण्यातील एक हजारपेक्षा जास्त लोकांचे दीर्घकाळ निरीक्षण केल्यानंतर त्यांना पुन्हा कोरोनाची बाधा होण्याची शक्यता अगदीच विरळ असून त्यांची आजारानंतरची नैसर्गिक प्रतिकार शक्तीही खूप काळ टिकणारी असल्याचे सूचित होते.
डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील साथरोग तज्ज्ञ आणि कम्युनिटी मेडिसीन तज्ज्ञांनी पुणे मेट्रोपोलिटन रिजनमध्ये राहणाऱ्या १,०८१ जणांचे सप्टेंबर २०२० पासून यावर्षी जूनपर्यंत संशोधन केले. या १,०८१ जणांनी सिरो सर्व्हेमध्ये सार्स-कोव्ह-२ अँटिबॉडीज दाखवली होती.
अभ्यास झालेल्या या १,०८१ जणांपैकी फक्त १३ जणांना अभ्यासाच्या नऊ महिन्यांत चाचणीत पुन्हा कोविडची बाधा झाली होती म्हणजेच पुन्हा बाधा होण्याचे प्रमाण होते १.२ टक्के, असे अभ्यासात आढळले. या १३ जणांमध्ये दुसऱ्यांदा झालेली कोविडची बाधा फारच साैम्य होती आणि ते पूर्णपणे बरेही झाले हे महत्वाचे. तज्ज्ञांचे म्हणणे असे की, ज्या देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे आणि त्यावरील लसीची उपलब्धता मर्यादित आहे त्यांच्यासाठी अशा अभ्यासांचे परिणाम महत्वाचे आहेत.
ज्यांना कोणाला अजून कोरोनाची बाधा झालेली नाही व जे नैसर्गिक प्रतिकार क्षमता नसलेले आहेत अशा लोकांना प्राधान्याने कोरोनाला प्रतिबंध करणारी लस देऊन सरकार सामुहिक प्रतिकार शक्ती (हर्ड इम्युनिटी) किमान खर्चात प्राप्त करू शकते, असे या अभ्यासकांचे म्हणणे आहे.
रांगेत शेवटी उभे राहाया अभ्यासाचा असाही निष्कर्ष आहे की, कोरोनाच्या नैसर्गिक संसर्गातून बरे झाल्यामुळे व त्याची पुन्हा बाधा होण्याची शक्यता खूपच दुर्मिळ असल्यामुळे या लोकांनी लस घेण्यासाठीच्या रांगेत शेवटी उभे राहावे.