राजस्थानात याच वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात आम आदमी पक्षाही (आप) रिंगणात आहे. पक्षाचे संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सोमवारी जयपूर येथे एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी 'वन नेशन वन इलेक्शन'च्या (One Nation One Election) मुद्द्यावरून भाजपवर जबरदस्त टीका केली. असा नियम लागू झाल्यास भाजप 5 वर्षे तोंडही दाखवणार नाही. असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
आपचे संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले, ''नऊ वर्षे पंतप्रधान रहूनही नरेंद्र मोदी वन नेशन वन इलेक्शनवर मतं मागत आहेत. वन नेशन 100 इलेक्शन व्हावे. त्याच्याशी आम्हाला काय? यामुळे आपल्याला काय मिळेल. नऊ वर्षे पंतप्रधान राहिल्यानंतरही जर कुणी वन नेशन वन इलेक्शनवर मतं मागत असेल तर, याचा अर्थ काहीही काम केलेले नाही. वन नेशन वन एज्युकेशन, वन नेशन वन ट्रिटमेंट व्हायरल हवे.''
दर तीन महिन्याला व्हायरला हवी निवडणूक -पीएम मोदींवर हल्लाबोल करताना केजरीवाल म्हणाले, ''मी बराच विचार केला की, मोदी असे का बोलत आहेत? पाच वर्षात नेता आपल्या दारात तेव्हाच येतो, जेव्हा निवडणुका लागतात. आपल्या देशात दर सहा महिन्याला निवडणुका होतात. यामुळे पंतप्रधान मोदींनी दर सहा महिन्याला जनतेसमोर जावे लागते. याचा मोदींना त्रास आहे. पाच वर्षांतून एकदा निवडणुका झाल्या तर सिलिंडर पाच हजार रुपयांना मिळेल आणि पाच वर्षांनंतर मोदी म्हणतील की, आपण ते 200 रुपयांनी स्वस्त केले. वन नेशन 20 इलेक्शन व्हावे, अशी माझी मागणी आहे. दर तीन महिन्याला निवडणुका व्हाव्यात, हे लोक तोंड दाखवायला तर येतील. काही तर देऊन जाती.''