नवी दिल्ली : एटीएममधून तुम्हाला हवी असलेली रक्कम आली नाही पण प्रत्यक्ष खात्यातून ती रक्कम वजा झाल्याचे दिसले तर घाबरू नका. या व्यवहारांतील रक्कम पाच दिवसांच्या आत ग्राहकांना देण्याचे आदेश रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने सर्व बँकांना दिले आहेत. एटीएमच नव्हे, तर आॅनलाइन व्यवहारांबाबतही हे लागू असेल.
अनेकदा एटीएममधून हवी ती रक्कम बाहेर येत नाही. काही वेळा एटीएममध्येच पैसे नसतात वा काही वेळा तांत्रिक कारणांमुळे असे घडते. पैस न मिळताही ती रक्कम तुमच्या खात्यातून काढली गेल्याचा संदेश मात्र येतो. आॅनलाइन व्यवहारातही तो पूर्ण नाही झाला तरी पैसे कापले गेल्याचे दिसते. असा कोणत्याही व्यवहार अयशस्वी झाल्यास ती रक्कम पाच दिवसांच्या आता देण्याचे बंधन संबंधित बँकेवर असेल.
ती रक्कम पाच दिवसांच्या आत ग्राहकाच्या खात्यात जमा न केल्यास पुढील प्रत्येक दिवसासाठी ॉ१00 रुपये देणेही बँकांना भाग असेल. रिझर्व्ह बँकेने ई-कॉमर्स पेमेंट आणि कार्यवाही पूर्ण करण्यासाठी नियमावली दिली आहे. बँकांना असफल डेबिट कार्ड व्यवहारांची प्रकरणे पाच दिवसांत पूर्ण करावी लागतील. त्यामुळे एटीएम, स्वाइप मशीन आधार अनेबल्ड पेमेंट कोणत्याही पेमेंट व्यवहाराचा मुद्दा वा पाच दिवसांत सोडवावा लागेल.
स्पष्ट सूचनारिझर्व्ह बँकेने अशा व्यवहारांवर लवकर तोडगा काढण्याचे निर्देश दिले, तसेच असफल व्यवहारात ग्राहकाला कापलेले पैसे वेळेत न मिळाल्यास बँकांना स्वत:च्या खिशातून ते द्यावे लागतील.