ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १० - आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेने पुन्हा निवडून दिल्यास संपूर्ण राज्यात दारूवर बंदी आणेन असे आश्वासन बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी दिले. पाटणा येथील एका गावातील कार्यक्रमादरम्यान एका महिलेने केलेल्या दारूबंदीच्या मागणीसंदर्भात उत्तर देताना त्यांनी गावक-यांना हे आश्वासन दिले.
' पुढच्या वेळेस आम्ही सत्तेत येऊ तेव्हा दारूवर बंदी घालण्यात येईल' असे ते म्हणाले. गेल्या काही वर्षांपासून बिहारमध्ये महिला संघटना, राजकारणी यांच्याकडून दारूबंदीची मागणी होऊ लागली आहे.
दारूच्या सेवनामुळेच राज्यात महिलांविरोधातील अत्याचार व क्रूर गुन्हे होत असल्याचे अनेक सर्वेक्षणांमधून समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात दारूबंदीची मागणी वाढू लागली आहे.