West Bengal assembly election: बंगाल निवडणुकीच्या निकालासंदर्भात खोटा ठरलो, तर...; प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 04:55 PM2021-02-27T16:55:03+5:302021-02-27T17:02:05+5:30

गृहमंत्री अमित शाह यांनी दावा केला आहे, की या निवडणुकीत भाजपला 200 हून अधिक जागा मिळतील. यामुळे प्रशांत किशोर यांनी केलेला दावा कितपत खरा ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (West Bengal assembly election 2021).

If proven wrong about election result in bengal hold me to my last tweet on 2nd may says Prashant kishor | West Bengal assembly election: बंगाल निवडणुकीच्या निकालासंदर्भात खोटा ठरलो, तर...; प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

West Bengal assembly election: बंगाल निवडणुकीच्या निकालासंदर्भात खोटा ठरलो, तर...; प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

googlenewsNext
ठळक मुद्देबंगाल निवडणुकीच्या निकालासंदर्भात आपले भाष्य खोटे ठरले, तर आपण मला 2 मेरोजी माझ्या ट्विटची आठवण करून द्या - प्रशांत किशोरदेशात लोकशाही टिकवूण ठेवण्याच्या दृष्टीने या निवडणुका अत्यंत महत्वच्या - प्रशांत किशोरप्रशांत किशोर यांनी गेल्या 21 डिसेंबरला एक ट्विट केले होते.

कोलकाता -पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) होणाऱ्या आगामी निवडणुकांसदर्भात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant kishor) यांनी शनिवारी मोठे भाष्य केले. भाजपवर निशाणा साधत, तृणमूल काँग्रेसचे मुख्य स्लोगन 'बंगालला केवळ स्वतःचीच मुलगी हवी आहे'चा उल्लेख करत, बंगाल निवडणुकीच्या निकालासंदर्भात आपले भाष्य खोटे ठरले, तर आपण मला 2 मेरोजी माझ्या ट्विटची आठवण करून द्या, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. यावेळी ते, देशात लोकशाही टिकवूण ठेवण्याच्या दृष्टीने या निवडणुका अत्यंत महत्वच्या ठरतील, असेही म्हणाले. (If proven wrong about election result in bengal hold me to my last tweet on 2nd may says Prashant kishor)

शरणार्थींच्या घरी भोजन अन् ममतांवर निशाणा; असा सुरू आहे अमित शाहंचा धडाकेबाज बंगाल दौरा, पाहा PHOTO

21 डिसेंबरला केले होते ट्विट -
प्रशांत किशोर यांनी गेल्या 21 डिसेंबरला एक ट्विट केले होते. यावरूनच त्यांनी हे भाष्य केले आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. पश्चिम बंगालमध्ये 27 मार्चपासून 29 एप्रिलदरम्यान 8 टप्प्यांत विधानसभा निवडणुका होतील. तर मत मोजणी इतर चार राज्यांच्या मतमोजणीसोबतच 2 मेरोजी होईल.

ट्विटमध्ये केली अशी भविष्यवाणी - 
प्रशांत किशोर यांनी आपल्या 21 डिसेंबरच्या ट्विटमध्ये दावा केला होता, की बंगालमध्ये भाजपला 99 हून अधिक जागा मिळाल्या तर निवडणूक रणनीतीकार म्हणून सन्यास घेईल. याच ट्विटसंदर्भात प्रशांत यांनी भाष्य केले आहे.

पश्चिम बंगाल निवडणूक: काल सीएम ममता तर आज स्मृती ईरानी दिसल्या स्कूटरवर, असा होता अंदाज

बंगालची निवडणूक म्हणजे लोकशाही वाचविण्याची लढाई -
टीएमसीचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे, की "देशात लोकशाही वाचविण्यासाठीची एक लढाई बंगालच्या निवडणुकीत होत आहे. बंगालच्या जनतेने या निवडणुकीसाठी मनोमन निश्चय करून ठेवला आहे आणि ते पुढील निवडणुकीत योग्य व्यक्तीच निवडतील." याच बरोबर, 'बंगालला केवळ स्वतःचीच मुलगी हवी आहे.' तसेच जर बंगाल निवडणुकीसंददर्भात माझे आकलन खोटे ठरले, तर मी ट्विटर सोडून देईन," असेही प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

प्रशांत किशोर यांची कंपनी I-PAC या निवडणुकीत टीएमसीच्या रणनीतीवर काम करत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये भाजपला 18 जागा मिळाल्या आहेत. यानंतर ममत विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांच्या कंपनीची मदत घेत आहेत..

तत्पूर्वी गृहमंत्री अमित शाह यांनी दावा केला आहे, की या निवडणुकीत भाजपला 200 हून अधिक जागा मिळतील. यामुळे प्रशांत किशोर यांनी केलेला दावा कितपत खरा ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

"बंगाल को अपनी बेटी चाहिए, बुआ नहीं", 'ते' पोस्टर ट्विट करत भाजपाचा ममता बॅनर्जींना सणसणीत टोला

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभा निवडणूक -
पहिला टप्पा - 27 मार्च मतदान
दुसरा टप्पा - 1 एप्रिल मतदान
तिसरा टप्पा - 6 एप्रिल मतदान
चौथा टप्पा - 10 एप्रिल मतदान
पाचवा टप्पा - 17 एप्रिल मतदान
सहावा टप्पा- 26 एप्रिल मतदान
सातवा टप्पा- 26 एप्रिल मतदान
आठवा टप्पा- 29 एप्रिल मतदान
 

Web Title: If proven wrong about election result in bengal hold me to my last tweet on 2nd may says Prashant kishor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.