शिवसेनेने भाजपशी संबंध तोडले तरच ठरेल काँग्रेसची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 01:05 AM2019-11-02T01:05:20+5:302019-11-02T06:49:47+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते, ते पाहूनच आपण निर्णय घ्यावा,
नवी दिल्ली : भाजप-शिवसेनेत सत्तासंघर्ष सुरू असतानाच राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी शुक्रवारी संध्याकाळी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि त्यांना राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. या बैठकीत काँग्रेसतर्फे कोणताही निर्णय झाला नाही. मात्र शिवसेनेने भाजपशी पूर्णपणे संबंध तोडले तर भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करू शकेल, असे समजते.
राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते, ते पाहूनच आपण निर्णय घ्यावा, असेही काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांना वाटत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रविवारी सोनिया गांधी यांना भेटणार आहेत. त्यानंतर दोन्ही पक्ष एकत्रपणे भूमिका ठरवतील, असे समजते. तोपर्यंत शिवसेना व भाजप यांच्यातील संघर्षावर संपतो की भाजप वा सेना वेगळा निर्णय घेतात, याचीही पाहणी करावी, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.