शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

शिवजींची इच्छा असेल तर पुन्हा अमरनाथ यात्रेला जाईन- सलीम

By admin | Published: July 12, 2017 12:04 PM

भगवान शिवजींच्या मनात असेल तर मी पुन्हा अमरनाथला जाईन, असं सलीमने सांगितलं आहे.

ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 12- अमरनाथ यात्रेदरम्यान यात्रेकरूंवर सोमवारी रात्री हल्ला झाला. या हल्ल्यानंतर मंगळवारी सकाळी यात्रेकरूंना घेऊन जाणारा बसड्रायव्हर प्रकाशझोतात आला. सलीम शेख या बस चालकाने दाखविलेलं प्रसंगावधान अगदी सगळीकडेच चर्चेचा विषय आहे. दहशतवाद्यांनी ज्या बसवर गोळीबार केला त्या बसचा ड्रायव्हर असलेल्या सलीमने धाडसाने ५० लोकांचं जीव वाचवले. या घटनेनंतर "अहमदाबाद मिरर" या वृत्तपत्राने ने सलीमशी बातचित केली आहे. यामध्ये सलीमने घटनास्थळाचा अनुभव सांगितला आहे. मला भारतीय असण्यावर अभिमान आहे आणि भगवान शिवजींच्या मनात असेल तर मी पुन्हा अमरनाथला जाईन, असं सलीमने सांगितलं आहे.
 
मी खूप हैराण आहे, मला घटनेमुळे धक्का बसला आहे आणि मी दु:खीही आहे. मंगळवारी दिवसभर मी दहशतवादी हल्ल्याबद्दल राजकीय नेत्यांची वक्तव्य ऐकत होतो. मला राजकारण कळत नाही. पण बसमधल्या सगळ्या प्रवाशांचे जीव मी वाचवू शकलो नाही, याचं मला दु:ख आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सात भाविकांचे जीव मी वाचवू शकलो नाही याची मला आयुष्यभर खंत राहील.पण पन्नास पेक्षा जास्त लोकांना वाचवून सुरक्षित स्थळी पोहचविल्याचं समाधानही मला आहे. जी लोकं हल्ल्यात किरकोळ जखमी झाले होते ते नंतर माझ्याकडे येऊन मला धन्यवाद देत होते. पण मी त्यांना द्यायला माझ्याकडे काहीही उत्तर नव्हतं, कारण तिथे फक्त सगळीकडे रक्त आणि मृत्यूचं तांडव होतं. मला इतका मोठा धक्का बसला होता की जवळपास दीड तासाने मला आजूबाजूला काय घडतं आहे ते समजलं.
आणखी वाचा
अबब! त्यांनी नोकरांसाठी घेतला 265 करोड रुपयांचा बंगला
 

झिम्बाब्वेने केलेला पराभव जिव्हारी, मॅथ्यूजचा कर्णधारपदाचा राजीनामा

रवी शास्त्रींवर नियंत्रण ठेवण्यासाठी झहीर, राहुल द्रविडची निवड ?

सूरत एअरपोर्टवर पोहचल्यावर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी मला भेटले होते तेव्हा माझ्या नावाची शिफारस शौर्यपुरस्कारासाठी करणार असल्याचं मला समजलं.  खरंतर शौर्य पुरस्काराचं खरं श्रेय तर हर्षभाईंना जातं आहे. हर्षभाई तेव्हा क्लिनरच्या सीटवर बसले होते. त्यांनीच मला सांगितलं, की गाडी न थांबवता वेगाने पुढे घेऊन जा. त्याच्या सल्ल्यानंतर गोळीबार सुरू असताना मी बसमध्ये खाली झुकून बसलो पण बसचं स्टीअरिंग माझ्या हातात होतो. बस कुठे चालली आहे याची जराही कल्पना मला नव्हती.  याचदरम्यान हर्षभाईला गोळ्या लागल्या. मी जर बसमध्ये खाली झुकलो नसतो तर त्या गोळ्या मलाही लागल्या असत्या, असं सलीमने म्हंटलं आहे.