शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
4
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
5
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
6
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
7
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
8
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
9
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
10
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
11
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
12
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
13
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
14
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
15
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
16
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
17
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
18
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
19
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
20
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!

युद्धाचे संकेत? चीनसोबत चर्चा फिस्कटली तर सैन्य कारवाईचा विचार; सीडीएस बिपीन रावत यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 10:25 IST

IndiaChinaFaceoff: आम्ही मागे हटू पण भारतानेही फिंगर ४ पासून स्वहद्दीत मागे जावे अशी अट चीनने ठेवताच भारताने त्यास नकार दिला. चिनी सैनिक फिंगर चारमध्ये स्वहद्दीत गस्त घालत नव्हते, आता तेथे सैनिकांची संख्या वाढली असल्याचे भारताला मान्य नाही.

एलएसी (Line of Actual control) वर भारत आणि चीनमधील तणाव निवळण्यासाठी मोठे प्रयत्न सुर आहेत. मात्र, चीन काही लडाखमधून मागे हटण्यास तयार नाहीय. तसेच सीमेवर मिसाईल, रणगाडे, लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत. यावर चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी गंभीर इशारा दिला आहे. 

रावत यांनी सांगितले की, लडाखमध्ये चिनी सेनेला मागे हटविण्यासाठी विविध स्तरांवर चर्चा सुरु आहेत. मात्र, सैन्य आणि राजनैतिक चर्चा अपयशी ठरली तर शेवटी सैन्य़ कारवाईचा पर्यायावर विचार केला जाणार आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी आजतकला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केले आहे. एलएसीवर वादाचे कारण सीमारेषेबाबत वेगवेगळे विचार असतात. चीन आताही पेगाँग तलावाच्या परिसरात तळ ठोकून आहे. तो फिंगर5 पासून मागे हटण्यास तयार नाहीय. यावर रावत यांनी सैन्य पर्याय काय़ असतील यावर बोलण्यास नकार दिला. 

दरम्य़ान, एलएसीवर वाद सोडविण्यासाठई भारत आणि चीनमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून अनेकदा सैन्य अधिकाऱ्यांच्या चर्चा झालेल्या आहेत. यामध्ये लेफ्टनंट, जनरल स्तरावरील चर्चा आहेत. राजनैतिक स्तरावरही चर्चा सुरु आहेत. संयुक्त सचिव स्तराचे अधिकारी चीनसोबत चर्चा करत आहेत. दोन्ही बाजुंकडून चीनवर तणाव कमी करण्यावर बोलणी केली जात आहेत. मात्र, अद्यापही एलएसी वादावर तोडगा निघालेला नाही. फिंगर आणि डारला भागात चीनची पिपल्स लिबरेशन आर्मी युद्धाभ्यास करत आहे. अशातच रावत यांनी सैन्य पर्यायाचे वक्तव्य करत चीनला मोठा इशारा दिला आहे. 

चीनची अट भारताला अमान्यआम्ही मागे हटू पण भारतानेही फिंगर ४ पासून स्वहद्दीत मागे जावे अशी अट चीनने ठेवताच भारताने त्यास नकार दिला. चिनी सैनिक फिंगर चारमध्ये स्वहद्दीत गस्त घालत नव्हते, आता तेथे सैनिकांची संख्या वाढली असल्याचे भारताला मान्य नाही. उलट फिंगर चारमध्ये भारतीय सैनिक गेल्या सहा दशकांपासून तैनात असल्याने मागे हटणार नाहीत, असे भारताने स्पष्ट केले. गेल्या तीन महिन्यांपासून चीनी ड्रॅगनची भारताने वेगवेगळ्या स्तरावर कोंडी केली आहे. चीनने स्वहद्दीत माघार घेतल्याशिवाय संबंध पूर्ववत होणार नाहीत, असे भारताने स्पष्ट केले,

हा प्रस्ताव धुडकावला-चीनने भारताला फिंगर १ वरून मागे हटण्याचा प्रस्ताव देत स्वहद्दीत मागे हटण्याची तयारी दर्शवली. भारताने हा प्रस्ताव अमान्य केला. स्वहद्दीत मागे हटणार नाही, तुम्हीच १९९३ च्या करारानुसार मागे हटा, बांधकाम हटवा असे भारताने चीनला खडसावले. लष्करी, राजनैतिक स्तरावरील चर्चेदरम्यान चीन रोजच रंग बदलत असल्याने भारताने युद्धसज्जता केली आहे.फिंगर ४ व ८ जवळ चीनने मोठ्या प्मार्णावर स्वहद्दीत बांधकाम केले. रस्ता बांधला. तात्पुरती चौकी उभारली. भारताने त्यास आक्षेप घेतला. कराराप्रमाणे चीन स्वहद्दीत पुढे येवू शकत नाही.

अन्य महत्वाच्या बातम्या...

लय भारी! SBI ATM येणार तुमच्या दारी; केवळ व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज करावा लागणार

धक्कादायक! महिलेवर 143 जणांचा बलात्कार, लैंगिक अत्याचार; 42 पानी FIR दाखल

अफाट संपत्ती! तीन किलो सोने, दोन किलो चांदी, नोटांच्या थप्प्या; टीडीपीच्या नेत्यावर सीबीआयचा छापा

65 वर्षांची महिला, 14 महिन्यांत 8 मुलींना जन्म दिला; घोटाळेबाज बिहारमध्ये झाले शक्य

वंदे भारत! चीनला रेल्वेचा आणखी एक झटका; 1500 कोटी रुपयांची निविदा रद्द

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावBipin Rawatबिपीन रावतladakhलडाखchinaचीनIndian Armyभारतीय जवान