आझमगड - बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी आज एका सभेला संबोधित करताना धर्मांतराबाबत मोठी घोषणा केली आहे. हिंदु धर्मातील धर्माचार्य न सुधरल्यास योग्य वेळी आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार करू, असा इशारा मायावती यांनी दिला आहे. मंगळवारी आझमगड येथे कार्यकर्त्यांच्या संमेलनाला संबोधित करताना मायावती यांनी हा इशारा दिला आहे. या संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत मायावती म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1935 साली मी हिंदू म्हणून जन्मास आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली होती. त्यानंतर बाबासाहेबांनी हिंदू धर्मातील अस्पृश्यतेमुळे हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. मात्र या घटनेनंतरही हिंदूधर्मातील धर्माचार्य, धर्मगुरू अद्यार सुधारलेले नाहीत. त्यामुळे भविष्यात मीसुद्धा हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारू शकते."यावेळी मायावती यांनी भाजपावर जोरदार टीका केली. "देशात भीतीचे वातावरण आहे. विशेषकरून मुस्लिमांमध्ये भाजपा आणि आरएसएसमुळे भय निर्माण झाले आहे. आता आगामी लोकसभा निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्यावर लढण्याची तयारी भाजपाकडून करण्यात येत आहे. हिंदूंना भ्रमित करण्यासाठी राम मंदिराचा राग पुन्हा आळवण्यात येत आहे. पण मंदिरात दान दक्षिणा देऊन केवळ तुमचा खिसा रिकामी होऊ शकतो," असेही
धर्मगुरू न सुधरल्यास हिंदू धर्माला देईन सोडचिठ्ठी, मायावतींचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 9:59 PM