अयोध्येच्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमातून परतताच वाल्मिकी समाजाच्या धर्मगुरुंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जर २२ जानेवारीला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली नसती तर आणखी ५० वर्षे यासाठी थांबावे लागले असते असे डॉ. देव सिंह अद्वैती महाराज यांनी म्हटले आहे.
अद्वैती महाराज यांचे रामनगरमध्ये स्वागत करण्यात आले. वाल्मिकी समाजाचे आयोध्येत अद्वैती महाराजांनी प्रतिनिधित्व केले होते. बुधवारी झालेल्या त्यांच्या स्वागत कार्यक्रमात अद्वैती महाराज यांनी २२ जानेवारीलाच राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा का केली गेली याचे कारण सांगितले आहे.
२२ जानेवारीलाच असा योग बनत होता जो अत्यंत योग्य होता. जर हा योग चुकला असता तर आपल्याला आणखी ५० वर्षे रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी वाट पहावी लागली असती. कित्येक वर्षांपासून पाहत आलेले स्वप्न पूर्ण होण्यास आणखी वेळ लागला असता, असे अद्वैती महाराजांनी सांगितले.
महर्षी वाल्मिकींबद्दलही महाराजांनी समाजातील लोकांशी सीतावणीत चर्चा केली. 22 जानेवारीला रामललाचा अभिषेक करण्यात आला. त्यासोबतच भगवान श्रीराम अयोध्या नगरीत विराजमान झाले आहेत. त्यांच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक अयोध्येत पोहोचत आहेत. ही गर्दी नियंत्रित करताना प्रशासनाची धावपळ उडाली आहे.