बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात आहेत. एकीकडे धीरेंद्र शास्त्री भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे त्यांचे विरोधक त्यांच्यावर अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप करत आहेत. दरम्यान, धीरेंद्र यांचे एक विधान चर्चेत आले आहे. हिंदूंच्या घरात दोन मुले असतील तर एका मुलाला रामनवमीच्या मिरवणुकीत पाठवा. जर चार मुले असतील तर दोन मुलांना रामनवमीच्या मिरवणुकीत पाठवा, असं विधान धीरेंद्र शास्त्री यांनी केलं आहे.
रामलीला मैदानावरील एका कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, मी काही फर्माइश केली की गाणाऱ्यातला व्यक्ती नाही. लोकांनी किती वेळा आव्हान दिलं. आम्ही प्रत्येक वेळी उत्तर दिलं. अशा प्रकारचं आव्हान देऊन मुलांनी स्वस्तात लोकप्रियता मिळवण्याचा नवा मार्ग शोधला आहे. पंडित प्रकाश टाटा यांनी नुकतेच बाबांना एक कोटी रुपयांचं आव्हान दिलं होतं, त्याबाबत धीरेंद्र शास्त्री बोलत होते.
रामलीला मैदानावरील कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात हजारो लोक सहभागी झाले होते. यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी हिंदू राष्ट्राच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. परिस्थिती कशीही असो, सर्व हिंदूंनी एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असेही धीरेंद्र म्हणाले. या कार्यक्रमाला संत-महात्मा आणि बाबांचे समर्थक मोठ्या संख्येने आले होते.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोपजादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव श्याम मानव यांनी जेव्हापासून धीरेंद्र कृष्ण यांच्यावर अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप केला आहे, तेव्हापासून बाबा खूप चर्चेत आहेत. बाबा ढोंग निर्माण करत असल्याचा आरोप श्याम मानव यांनी केला होता. ते केवळ अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत आहे. त्यांच्याकडे कोणतेही सिद्धी नाही. मात्र, श्याम मानव यांच्या या आरोपांनंतर अनेक हिंदू संघटना बाबांच्या समर्थनार्थ पुढे आल्या.