नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे. त्या म्हणाल्या, काश्मीरसाठी वाजपेयींनी जे काम केलं, ते पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूही करू शकले नाहीत. तसेच इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि नरेंद्र मोदींनाही काश्मीरसाठी तेवढं काम करणं शक्य झालेलं नाही.2004मध्ये जर वाजपेयींचं सरकार सत्तेवर आलं असतं, तर काश्मीरची समस्या कायमची सुटली असती, असंही त्या म्हणाल्या आहेत. आजतकच्या 'अजेंडा आजतक' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी 2003मधल्या एका घटनेचा उल्लेखही केला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी काश्मीरमध्ये एका रॅलीला संबोधित करण्यासाठी आले होते. त्या रॅलीमध्ये जवळपास 30 ते 40 हजार लोक उपस्थित होते. त्यावेळी वाजपेयींनी जनतेच्या मनातलं बोलून दाखवलं होतं. त्यामुळे जनताही खूश होऊन घरी गेली होती.2015मध्येही त्याच जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रॅली केली होती. त्यावेळीही 30 ते 40 हजार लोक उपस्थित होते. मोदींनी 80 हजार कोटींच्या पॅकेजचीही घोषणा केली, परंतु मोदींच्या घोषणेनं जनता खूश नव्हती. मोदींनी काश्मीरच्या प्रश्नावर अवाक्षरही काढलं नाही. वाजपेयी आणि मोदींमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनीही काश्मीर सुंदर बनवणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु त्यानंतर काश्मीरची परिस्थिती बिघडत गेली.इंदिरा गांधीही म्हणाल्या होत्या. सुईला परत फिरवता येत नाही. परंतु सुई त्याच जागेवर अडकून पडली आहे. कारगिल आणि संसदेवर हल्ल्यानंतरही वाजपेयींनी परवेज मुशर्रफ यांच्या बातचीत सुरूच ठेवली होती. कारण त्यांना माहीत होतं, काश्मीर प्रश्न हा गोळीनं नव्हे, तर चर्चेनं सुटणार आहे. वाजपेयींनी काश्मीरसाठी केलेल्या कामाच्या आधारवरच मी भाजपाशी युती करण्याचा नुकसानदायी निर्णय घेतला होता. काश्मीरची समस्या सुटेल असं मला वाटतं होतं. परंतु ती बाब फोल ठरली आहे. मोदींकडे बहुमताचं सरकार होतं. त्यांनी ठरवलं असतं तर काश्मीर प्रश्न सुटला असता. पण त्यांना तसं नको होतं, असंही मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या आहेत.
वाजपेयी सरकार असतं, तर 2004मध्येच काश्मीर प्रश्न सुटला असता- मेहबुबा मुफ्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 8:58 AM
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे.
ठळक मुद्देजम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला काश्मीरसाठी वाजपेयींनी जे काम केलं, ते पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूही करू शकले नाहीत2004मध्ये जर वाजपेयींचं सरकार सत्तेवर आलं असतं, तर काश्मीरची समस्या कायमची सुटली असती,