ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - काँग्रेस नेता सैफुद्दीन सोझ यांनी आपण सत्तेत असतो तर बुरहान वानीला जिवंत ठेवलं असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बुरहान वानी जिवंत असता, तर आपण त्याच्याशी बातचीत केली असती असंही सैफुद्दीन सोझ बोलले आहेत. बुरहान वानीच्या मृत्युला एक वर्ष पुर्ण होत असतानाच सैफुद्दीन सोझ यांनी हे वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा -
"जर मी सत्तेत असतो तर बुरहान वानीला मरु दिलं नसतं. मी त्याच्याशी चर्चा केली असती. मी त्याला समजावलं असतं की, भारत, पाकिस्तान आणि काश्मीरमध्ये मैत्रीचा पूल बांधला जाऊ शकतो. आणि या कामात तुझी मदत महत्वाची ठरु शकते. पण आता तो जिवंत नाही आहे. आपल्याला काश्मिरी जनतेचं दुख: समजायला हवं", असं काँग्रेस नेता सैफुद्दीन सोझ बोलले आहेत.
Mere bas mein hota toh Burhan Wani ko zinda rakhta aur unse dialogue karta:Saifuddin Soz,Congress pic.twitter.com/honbc2fnxf— ANI (@ANI_news) July 7, 2017
दरम्यान बुरहान वानीच्या मृत्यूला एक वर्ष पुर्ण होत असल्याने काश्मीर खो-यात सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. बुरहान वानी काश्मीर खो-यात हिजबूल मुजाहिद्दीनचा पोस्टर बॉय होता. गतवर्षी 8 जुलै रोजी जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तो ठार झाला. बुरहान वानीच्या मृत्यूनंतर काश्मीर खो-यात अनेक ठिकाणी हिंसाचार सुरु झाला होता. सलग 53 दिवस कर्फ्यू लावण्यात आला होता. खो-यात जवळपास पाच महिन्यांसाठी शातंता होता. या कार्यकाळात 73 जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये दोन पोलीस कर्मचा-यांचाही समावेश होता.
People who call terrorists leaders, do they want to glorify them? Terrorists will always be treated like terrorists: Nirmal Singh, Dy CM J&K pic.twitter.com/tWS2BUIXy0— ANI (@ANI_news) July 7, 2017
बुरहानला हुतात्मा होऊ देण्यास इंग्लंडचाही नकार
भारत सरकारने केलेल्या तीव्र विरोधानंतर बर्मिंगहॅम सिटी कौन्सीलला बुरहान वानी दिवसाला दिलेली परवानगी रद्द करावी लागली आहे. हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा दहशतवादी बुरहानच्या मृत्युला एक वर्ष पुर्ण झाल्याबद्दल बर्मिंगहॅम शहरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला बुरहान वानी डे असे नावही देण्यात आले होते. भारताने यावर नाराजी व्यक्त करुन त्यास तीव्र विरोध केला. त्यामुळे या कार्यक्रमाची परवानगी आता रद्द करण्यात आली आहे.