कोचिन - 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कंबर कसली आहे. सत्तेत आल्यास गरिबांना दरमहा निश्चित वेतन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आता राहुल गांधी यांनी महिलांनाही मोठे आश्वासन दिले आहे. 2019 साली सत्तेत आल्यास अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले महिलाआरक्षण विधेयक संसदेमध्ये पारित करून घेऊ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.कोचिन येथे बुथ कार्यकर्त्यांशी चर्चा करताना राहुल गांधी यांनी सांगितले की, ''2019 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर सर्वप्रथम आम्ही संसदेत महिला आरक्षण विधेयक पारित करून घेऊ. महिलांच्या नेतृत्वाला राजकीय क्षेत्रात वरच्या पातळीवर आणण्याची आमची इच्छा आहे.'' एका कार्यकर्त्याने दिलेल्या सल्ल्यावर बोलताना राहुल गांधी यांनी ही घोषणा केली.
गरीबांना वेतनानंतर राहुल गांधी यांनी महिलांना दिले मोठे आश्वासन, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 7:23 PM
2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कंबर कसली आहे. सत्तेत आल्यास गरिबांना दरमहा निश्चित वेतन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आता राहुल गांधी यांनी महिलांनाही मोठे आश्वासन दिले आहे.
ठळक मुद्दे2019 साली सत्तेत आल्यास अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये पारित करून घेऊमहिलांच्या नेतृत्वाला राजकीय क्षेत्रात वरच्या पातळीवर आणण्याची आमची इच्छा लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यात यावे अशी महिला आरक्षण विधेयकात तरतूद