कोईमतूर: एअर स्ट्राइकमध्ये कोणतंच नुकसान झालं नाही, दहशतवादी मारले गेले नाहीत, भारतीय हवाई दलाचे बॉम्ब जंगलात पडले, असे विविध दावे करणाऱ्या पाकिस्तानला हवाई दलानं मोजक्या शब्दात चोख प्रत्युत्तर दिलं. आमचे बॉम्ब जंगलात जंगलात पडले असते, तर पाकिस्तानचे पंतप्रधान यावर बोलले नसते आणि त्यांच्याकडून प्रत्युत्तरादाखल कारवाईदेखील झाली नसती, असं उत्तर हवाई दलाचे प्रमुख बी. एस धनोआ यांनी पाकिस्तानला दिलं. भारतीय हवाई दलाचा हल्ला अयशस्वी झाल्याचा दावा पाकिस्तानकडून वारंवार करण्यात आला. त्यासाठी बालाकोट, चकोठी आणि मुझफ्फराबाद येथील भागांचे फोटो दाखवण्यात आले. या भागात सारं काही आलबेल असल्याचं चित्र पाकिस्ताननं उभं केलं. त्यावर हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाष्य केलं. एअर स्ट्राइकदरम्यान टाकलेले बॉम्ब जंगलात पडले, असा दावा त्यांनी (पाकिस्ताननं) केला. पण आमचे बॉम्ब जर जंगलात पडले असते, तर त्यांनी (पाकिस्तानी पंतप्रधान) प्रत्युत्तर दिलं नसतं. आम्ही लक्ष्यभेद केला. त्यामुळेच तर प्रतिहल्ला करण्यात आला, असं धनोआ म्हणाले.
'बॉम्ब जंगलात पडले असते, तर पाकिस्ताननं त्वरित प्रत्युत्तर दिलं नसतं'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 1:22 PM