शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

Amit Shah : "सत्यपाल मलिक म्हणाले ते सत्य असेल तर राज्यपाल असताना शांत का होते?" अमित शाहंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 1:13 PM

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत केलेल्या आरोपावर गृहमंत्री अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिलंय.

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अलीकडेच पुलवामा हल्ल्यासह अनेक मुद्द्यांवर खळबळजनक गौप्यस्फोट केले होते. यावरून देशात राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. यावरून विरोधी पक्षानंही सरकारवर सतत हल्लाबोल करत आहे. सत्यपाल मलिक यांच्या गौप्यस्फोटानंतर त्यांना मिळालेल्या सीबीआय नोटीसबाबत प्रश्नांची उत्तरे देण्याबरोबरच गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका कार्यक्रमादरम्यान सत्यपाल मलिक यांच्यावर पलटवार केला. आमची साथ सोडल्यानंतरच त्यांना याची आठवण का येतेय? ज्यावेळी सत्तेत असतो त्यांची सद्सद्विवेकबुद्धी जागृत होत नाही, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला. सत्यपाल मलिक यांच्या विश्वासार्हतेवर अमित शाह यांनी यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “जनतेनx याचा विचार करायला हवा. सत्यपाल मलिक यांचे म्हणणे योग्य असेल तर मग ते राज्यपाल असताना शांत का होते? सत्यपाल मलिक यांनी राज्यपाल असताना या विषयावर बोलायला हवे होते. हे सर्व सार्वजनिक चर्चेचा विषय नाहीत,” असं ते आरोपांवर बोलताना म्हणाले. अमित शाह इंडिया टुडेच्या राऊंड टेबल या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांवर भाष्य केल.

जनतेनं मूल्यमापन करावं“मी देशातील जनतेला नक्कीच सांगू इच्छितो की, भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं लपविण्यासारखं कोणतंही काम केलेलं नाही. आपल्या राजकीय स्वार्थासाठी कोणी आपल्यापेक्षा वेगळे काही बोलत असेल तर त्याचं मूल्यमापन माध्यमांनीही करावं, जनतेनंही करावे. तुम्ही पदावर नसताना आरोपाचे मूल्य आणि मूल्यमापन दोन्ही घसरतं,” असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.

राजकारणात असं घडतंजेव्हा तुम्ही सत्यपाल मलिक यांची राज्यपालपदी निवड केली तेव्हा तुम्ही चुकीची व्यक्ती निवडली असं तुम्हाला वाटलं नाही का? असा प्रश्न शाह यांना करण्यात आला. ते दीर्घकाळापासून पक्षासोबत आहेत. राजनाथ सिंह अध्यक्ष असताना ते पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते आणि आमच्या टीममध्येही होते. आता कोणी आपली भूमिका बदलतं, त्यावर आम्ही काय बोलू शकतो. राजकारणात असं घडत असतं,” असं त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :Amit Shahअमित शाहJammu Kashmirजम्मू-काश्मीरHome Ministryगृह मंत्रालय