जयपूर : तुम्ही हिंदू असाल, तर मला मत द्या आणि मुस्लीम असाल तर काँग्रेसला मत द्या, असे वादग्रस्त विधान राजस्थानचे मंत्री आणि अलवर लोकसभा मतदारसंघात होणाºया पोटनिवडणुकीतील उमेदवार डॉ. जसवंत यादव यांनी केले आहे.डॉ. जयवंत यादव यांनी जाहीर सभेत केलेल्या भाषणाची चित्रपिन काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. डॉ. यादव धार्मिक विद्वेष निर्माण करू पाहत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. डॉ. यादव हे राजस्थानचे श्रम व नियोजनमंत्री आहेत. तुम्ही हिंदू असाल तर मला मतदान करा आणि मुस्लीम असाल तर काँग्रेसचे उमेदवार करणसिंह यांना मते द्या असे डॉ. यादव एका सभेत म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे राजस्थानातील दोन्ही समाजात खळबळ माजली आहे.आयोगाच्या भूमिकेकडे लक्षअलवर आणि अजमेर लोकसभा मतदारसंघांत २९ जानेवारी रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या दोन्ही जागांवर भाजपाचे खासदार होते. अलवरमधून महंत चांदनाथ आणि अजमेरमधून सांवरलाल जाट निवडून आले होते. दोघांच्या निधनामुळे इथे पोटनिवडणूक होत आहे. यादव यांच्या या वक्तव्यावर निवडणूक आयोग काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
हिंदू असाल तर तुम्ही भाजपाला मते द्या, मुस्लीम असणा-यांनी काँग्रेसला मते द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:15 AM