शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

जूनपर्यंत १,५०० कोटी न भरल्यास पुन्हा तुरुंग, सुब्रतो रॉयना कोर्टाची तंबी

By admin | Published: April 28, 2017 1:52 AM

सहारा उद्योगसमुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या पॅरॉलची मुदत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी १९ जूनपर्यंत वाढविली.

नवी दिल्ली : सहारा उद्योगसमुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या पॅरॉलची मुदत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी १९ जूनपर्यंत वाढविली. मात्र त्याचबरोबर गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी रॉय यांनी कबूल केल्याप्रमाणे १५ जूनपर्यंत १,५०० कोटी रुपये ‘सीबी’कडे जमा केले नाहीत तर त्यांची पुन्हा तुरुंगात रवानगी केली जाईल, अशी तंबीही न्यायालयाने दिली.आधी दिलेल्या अदेशानुसार सुब्रतो रॉय न्या. दीपक मिश्रा, न्या. रंजन गोगोई व न्या. ए.के. सिक्री यांच्या खंडपीठापुढे हजर राहिले. आपण १५ जूनपर्यंत १,५०० कोटी रुपये व त्यानंतर १५ जुलैपर्यंत आणखी ५५२.२२ कोटी रुपये ‘सेबी’कडे जमा करू, असे वचन देणारे प्रतिज्ञापत्रही त्यांनी सादर केले. सहारा ‘सेबी’कडे ‘आरटीजीएस’ने १५ जूनपर्यंत पैसे जमा करू शकेल, असे स्पष्ट करण्यात आले. जुलैमधील हप्त्याचा अग्रिम चेक रॉय यांनी सादर केला. हप्त्याने पैसे परत करण्यासाठी न्यायालयाने यापूर्वी जे वेळापत्रक ठरवून दिले आहे. त्यानुसार रॉय यांना प्रत्येक तारखेला पैसे द्यावे लागतील. अन्यथा पॅरोल रद्द करून पुन्हा तुरुंगात रवानगी केली जाईल, अशी खंडपीठाने त्यांना समज दिली. १९ जूनलाही त्यांना जातीने हजर राहण्यास सांगण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)अ‍ॅम्बी व्हॅलीचा लिलावगुंतवणूकदारांचे पैसे चुकते करण्यासाठी सहारा समुहाच्या लोणावळ््याजवळील अ‍ॅम्बी व्हॅलीचा लिलाव करण्याचे आदेश याआधीच दिले गेले आहेत. हा लिलाव मुंबई उच्च न्यायालयाच्या आॅफिशियल लिक्विडेटरमार्फत केला जाणार आहे. त्यांनी या मालमत्तेचे मूल्यांकनही केले आहे. आता लिक्विडेटरने लिलावाच्या अटी व शर्तींचा मसुदा तयार करून तो मंजुरीसाठी १९ जूनपरर्यंत सादर करावा, असे निर्देशही खंडपीठाने दिले.वचन न पाळणाऱ्यास कैद-दिलेले वचन न पाळून न्यायालयाचा अवमान (कन्टेम्प्ट आॅफ कोर्ट) केल्याबद्दल चेन्नई येथील प्रकाश स्वामी या व्यक्तीस अटक करून त्यांची रवानगी एक महिन्याची शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात करण्याचा आदेशही खंडपीठाने दिला. सहाराचे न्यूयॉर्क येथील एक पंचतारांकित हॉटेल खरेदी करण्यात स्वारस्य दाखवून या स्वामींनी एका विदेशी कुलमुखत्यार म्हणून एक प्रतिज्ञापत्र केले होते व त्यासाठी सुरुवातीची रक्कम म्हणून १०० कोटी रुपये जमा करण्याची तयारी दर्शविली होती. इरादा नेक आहे हे दाखविण्यासाठी स्वामी यांनी प्रथम १० कोटी रुपये जमाही केले. मात्र गेल्या तारखेला त्यांनी आता त्या कंपनीला खरेदीत स्वारस्य नाही, असे कळविले होते.