अहमदाबाद - काँग्रेसने गुजरातचे नुकसान करण्याची एकही संधी सोडली नाही. गांधी कुटुंब आणि काँग्रेसला गुजरात काटयासारखा खुपतो. देशाची सेवा करणा-या ख-या नायकांचा काँग्रेसने अपमान केलायं. काँग्रेसने देशसेवेवर कधीही लक्ष दिले नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली. ते गुजरात गौरव यात्रेमध्ये बोलत होते. जातीयवाद आणि लोकांची दिशाभूल करणे हे काँग्रेसचे निवडणुकीतील मुख्य शस्त्र आहे.
मी फक्त एका राज्याचा मुख्यमंत्री होतो तेव्हा तुमच्याकडे संपूर्ण हिंदुस्थानची सत्ता होती. त्यावेळी काँग्रेसने भरपूर षडयंत्र रचली असा आरोप मोदींनी केला. काँग्रेसला काही जमले नाही तेव्हा त्यांनी विकासला शिव्या घालायला सुरुवात केली. काँग्रेस पक्षाच्या मनात विकासाबद्दल राग आहे असे मोदी म्हणाले. सरदार पटेलांची मुलगी, मोरारजी देसाईंबरोबर काँग्रेसने काय केले ते इतिहासाला माहित आहे.
मोरारजी देसाई पंतप्रधान असताना काँग्रेसला त्यांना संपवायचे होते. काँग्रेसला गुजरात आवडत नाही अशी टीका मोदी यांनी केला. निवडणूक आमच्यासाठी विकासवादाची तर, काँग्रेससाठी वंशवादाची लढाई आहे. मला विश्वास आहे या लढाईत विकासवाद जिंकेल असे मोदी म्हणाले. जीएसटीच्या मुद्यावरुन बचाव करताना त्यांनी जीएसटी लागू करण्याचा निर्णय एकटया मोदीचा नव्हता असे सांगितले. जीएसटी लागू करण्याआधी 30 पक्षांबरोबर चर्चा केली त्यांचा सुद्धा सहभाग होता. जीएसटीच्या निर्णयात काँग्रेसही समान भागीदार आहे. त्यांनी जीएसटीवरुन खोटया बातम्या पसरवू नये असे मोदी म्हणाले.
- काँग्रेसने देशाला अनेक नेते दिले पण सध्या त्यांचे सर्व लक्ष खोटे बोलण्यावर असते. - काँग्रेसची स्थिती इतकी चांगली होती मग निवडणुकीआधी त्यांचे 25 टक्के आमदार का सोडून गेले ?. - काँग्रेसने लोकांना भ्रमित करु नये, विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढा. - सरदार पटेलासोबत काँग्रेसने काय केले ते इतिहासाला माहित आहे.- जीएसटी संबंधी सर्व पक्षांनी मिळून निर्णय घेतला. एकटया काँग्रेसला टीका करण्याचा अधिकार नाही. - गुजरातच्या विकासासंबंधी काँग्रेसचा दृष्टीकोन नेहमीच नकारात्मक राहिला आहे, त्यांनी सरदार सरोवर प्रकल्पही पूर्ण केला नाही. - वंशवाद हरणार, विकासवाद जिंकणार. - एका बाजूला घराणेशाहीवर चालणारे पक्ष आहेत आणि दुस-या बाजूला विचारधारेवर चालणारा पक्ष आहे.- देशसेवेसाठी भाजपा पूर्णपणे कटिबद्ध आहे, उत्तर प्रदेशच्या विजयासाठी अमित शहांना सामनावीराचा पुरस्कार जातो.- काँग्रेसने लोकांना भ्रमित करु नये, विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढा.