कोलकाता - केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरात आगडोंब उसळला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट होत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून मोदींवर जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशात संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षणाखाली सार्वमत घ्यावे असे आव्हान त्यांनी दिले आहे. गुरुवारी एका प्राचरसभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ''केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्र आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यासारख्या कुठल्याही निष्पक्षपाती संघटनेच्या देखरेखीखाली सार्वमत घ्यावे आणि किती नागरिक नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या बाजूने आहेत आणि किती नागरिक विरोधात आहेत हे विचारावे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७३ वर्षांनी आम्हाला अचानकपणे आम्ही भारतीय नागरिक आहोत हे सिद्ध करावे लागणार आहे. तुम्ही तुमचा विरोध मवाळ करू नका कारण आपल्याला नागरिकत्वविरोधा कायदा रद्द करायचा आहे.''
हिंमत असेल तर CAA बाबत संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली सार्वमत घ्या, ममतांचे मोदींना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 7:27 PM