कानपूर:उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुन्हेगारांविरोधातील कठोर कारवाईसाठी ओळखले जातात. गेल्या काही वर्षात युपीत बुलडोझरसह विविध प्रकारची कारवाई केल्यामुळे राज्यातील गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यातच आता सीएम योगी यांनी तरुणींची/महिलांची छेड काढणाऱ्यांना किंवा गंभीर गुन्हे करणाऱ्यांना कठोर शब्दात इशारा दिला आहे.
...तर चौकात ठार करूशुक्रवारी कानपूरमधील व्हीएसएसडी कॉलेजच्या मैदानावर झालेल्या प्रबुद्धजन संमेलनात बोलताना योगी आदित्यानाथ म्हणाले की, 'ICCC अंतर्गत कानपूरसह 18 शहरे सुरक्षित शहर बनण्याच्या मार्गावर आहेत. आता उत्तर प्रदेशात गुन्हे कमी झाले आहेत. गुन्हेगार गुन्हे करण्यापूर्वी विचार करतात. आता एखाद्या चौकात तरुणीची छेड काढली किंवा एखाद्या गुन्हेगाराने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, सीसीटीव्हीत तो कैद होईल आणि पुढच्याच चौकात त्याला ठार केले जाईल, असे वक्तव्य योगी यांनी केले आहे.
अनेक प्रकल्पांचे उद्घाटनयावेळी योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 388 कोटी रुपयांच्या 272 प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजिन सरकार कानपूरची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकासाची पायाभरणी केली जात आहे. मेट्रो रेल्वे, डिफेन्स कॉरिडॉर, स्मार्ट सिटी, नमामि गंगे प्रकल्पांतर्गत कानपूरचा कायापालट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे योगी यावेळी म्हणाले.