लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्र सरकार आम्हाला करातील हिस्सा देत नाही आणि आर्थिक मदतही करत नाही. आम्ही केंद्र सरकारला कररुपाने १०० रुपये पाठवितो, राज्य चालविण्यासाठी फक्त १२ ते १३ रुपये माघारी मिळतात असा आरोप करत कर्नाटक सरकारने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत केंद्राच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित होते. दक्षिणेकडील राज्यांवर भेदभाव नको, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुन्हा निदर्शनेकेरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह ८ फेब्रुवारीला केंद्राच्या दक्षिणेकडील राज्यांबद्दलच्या उदासीनतेच्या विरोधात दिल्लीत निदर्शने करणार आहेत, असे सिद्धरामय्या म्हणाले.
कर संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. या वर्षी कर्नाटकने कर संकलनात ४.३० लाख कोटी रुपयांचे योगदान दिले. –सिद्धरामय्या, मुख्यमंत्री, कर्नाटक