मदुराई : गरीब परिस्थितीमुळे फक्त सातवी इयत्तेपर्यंतच शिक्षण घेऊ शकलेल्या व उपजीविकेसाठी केशकर्तनाचा व्यवसाय करणाऱ्या पी. पोनमरियप्पन यांनी युवकांना वाचनाची गोडी लागावी म्हणून एक अभिनव शक्कल लढविली आहे. त्यांनी आपल्या सलूनमध्ये स्वत:च्या संग्रहातील ८०० पुस्तके ठेवली आहेत. या पुस्तकांचे मनापासून वाचन करणाºया ग्राहकांना ते केशकर्तनाच्या दरात ३० टक्के सूट देतात.तामिळनाडूतील तुतूकुडी जिल्ह्यातील मायलापूरम येथे पोनमरिअप्पन यांचे सलून आहे. त्यांना वाचनाची अतिशय आवड आहे. शिक्षण अर्धवट सुटल्यानंतर ते काही काळ एका वकिलाकडे काम करीत. तू शिकला असतास, तर तूही वकिल झाला असतात, असे त्याला अनेकांनी सांगितले. तेव्हापासून लोकांना वाचण्यास उद्युक्त करण्याचे ठरविले. वाचताना अडथळा नको, म्हणून त्यांनी टीव्हीही ठेवलेला नाही.
वाचलेल्या पुस्तकांसाठी अभिप्राय वहीच्सलूनमध्ये केस कापण्यासाठी येणाºया ग्राहकांना त्यांचा क्रमांक येईपर्यंत पोनमरियप्पन सलूनमधील पुस्तके वाचायला देतात. मोबाईल फोनमध्येच कायम गुंतलेले व सलूनमध्ये येणारे युवक पोनमरियप्पन यांच्या पुस्तकवाचनाच्या आग्रहामुळे पहिल्यांदा काहीसे वैतागले.च्पण त्यातील चांगला हेतू लक्षात आल्यानंतर मग त्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. मात्र काही युवक अजूनही पोनमरियप्पन यांना बिल्कुल जुमानत नाहीत. सलूनमध्ये बसून ग्राहकाने एखाद्या पुस्तकाची काही पाने जरी वाचली तरी त्याने त्याचा आशय तिथे ठेवलेल्या एका छोट्या वहीत लिहावा अशी विनंती पोनमरियप्पन करतात. वाचकांनी दिलेल्या अभिप्रायामुळे इतरांनाही वाचनाची प्रेरणा मिळते, असे त्यांना वाटते.