रत्नागिरी : रेल्वेने प्रवास करीत असताना सामान बाळगण्यासाठी आता विमानाप्रमाणे मर्यादा घालून देण्यात आली आहे. सोबत जास्त सामान न्यायचे असल्यास त्याचे शुल्क भरून रितसर पावती घ्यावी लागते. अन्यथा जादा सामान बाळगल्याचे निदर्शनास आल्यास सहापट दंड आकारण्यात येतो.
प्रवास करताना किती सामान सोबत बाळगावे, याबाबत भारतीय रेल्वेने मर्यादा घालून दिली आहे. त्यानुसार वेगवेगळ्या श्रेणीसाठी मर्यादा घालून देण्यात आल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ट्रीट करून, लोकांना प्रवासादरम्यान जास्त सामान घेऊन प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. सामानविषयक नियमांची रेल्वे विभागाकडून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
जास्तीच्या सामानासाठी...
विविध श्रेणीच्या डब्यातून प्रवास करताना किती सामान सोबत न्यावे, याबाबत रेल्वे मंत्रालयाने मर्यादा निश्चित केल्या आहेत.
निश्चित केलेल्या वजनापेक्षा अधिक वजन असेल आणि त्याचे शुल्क न भरल्यास सहा पट दंड भरावा लागणार आहे.
वजनानुसार शुल्क
रेल्वेतून प्रवास करताना सामानाची मर्यादा घालून देण्यात आली आहे, ती पूर्वीपासूनच आहे. विविध श्रेणीतील डब्यांसाठी सामानाचे वजन निश्चित करण्यात आले असून त्यानुसार शुल्क भरावे लागते - गिरीश करंदीकर, उप महाव्यवस्थापक, कोकण रेल्वे
४० किलो स्लीपर क्लाससाठी...
रेल्वेचा प्रवास स्लीपरमधून करताना ४० किलोपर्यंत सामान सोबत नेता येईल. अधिक सामानाकरिता निश्चित केलेले शुल्क भरावे लागेल. तशी पावती सोबत ठेवावी लागेल.
५० किलो टू टायर एसीसाठी
टू टायर एसीमधून प्रवास करताना जास्तीत जास्त ५० किलो इतके सामान आपल्यासोबत नेता येईल. अधिक सामानासाठी जादा सामानाचे शुल्क भरावे लागते.
७० किलो फर्स्ट क्लास एसीसाठी
फर्स्ट क्लास एसीमधून प्रवास करतानाही सामानाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार या श्रेणीच्या डब्यातून प्रवास करताना ७० किलो वजनाचे सामान सोबत नेता येते.
...अन्यथा भरावा लागेल दंड
विविध श्रेणीच्या डब्यातून प्रवास करताना किती सामान सोबत न्यावे, याबाबत रेल्वे मंत्रालयाने मर्यादा निश्चित केल्या आहेत.
निश्चित केलेल्या वजनापेक्षा अधिक वजन असेल आणि त्याचे शुल्क न भरल्यास सहा पट दंड भरावा लागणार आहे.