नवी दिल्ली – पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण झाली आहे. शाहिदने आपल्या चाहत्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केले आहे. याच दरम्यान मोदी सरकारमधील मंत्री प्रताप सारंगी यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी शाहिद आफ्रिदीला पंतप्रधान नरेंद्र मोदींची मदत घ्यावी असा सल्ला दिला आहे.
याबाबत केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी म्हणाले की, पाकिस्तानमधील प्रत्येक एका हॉस्पिटलची मला पूर्ण माहिती आहे. शाहिद आफ्रिदीला जर कोरोनातून वाचायचं असेल तर त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मदत घ्यावी.
शाहिद आफ्रिदीने मला कोरोनाची लागण झाली आहे अशी माहिती सोशल मीडियावरून दिली आहे. त्यानं लिहिलं की, गुरुवारपासून माझी तब्येत बिघडली होती. माझे शरीर प्रचंड दुखत होते. त्यानंतर मी वैद्यकिय चाचणी केली आणि त्यात कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मला आता तुमच्या प्रार्थनांची गरज आहे.
कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून आफ्रिदी अनेक गरजूंना सातत्यानं मदत करत आहे. त्यानं शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनच्या माध्यमातून पाकिस्तानातील अनेक भागांमध्ये गरजूंना अन्नधान्याचे वाटप केले. या कालावधीत तो अनेक लोकांना भेटला आणि त्यामुळेच त्याला कोरोना झाल्याची चर्चा सुरू आहे. आफ्रिदीनं बांगलादेशचा खेळाडू मुश्फिकर रहीम यालाही मदत केली. रहीमनं बांगलादेशमधील लोकांच्या मदतीसाठी त्याच्या द्विशतकाची बॅट लिलावासाठी ठेवली होती आणि आफ्रिदीनं ती खरेदी केली.
अलीकडेच शाहिद आफ्रिदीने कोरोना व्हायरसबाबत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरबाबत विधान केले होते, व्हिडीओ शेअर करत आफ्रिदी म्हणतो की, कोरोनापेक्षा मोठा रोग मोदी यांच्या मनात आणि डोक्यात आहे. तो आजार धर्माचा आहे. त्या आजारावर ते सत्ता चालवत आहेत. आमच्या काश्मिरी लोकांवर अत्याचार करत आहे याचे उत्तर त्यांना द्यावचं लागेल असं तो व्हिडीओत म्हणत होता. यानंतर आफ्रिदीने काश्मीरवरुन संताप व्यक्त केला. नरेंद्र मोदी सर्वात डरपोक माणूस आहे. मोदींनी काश्मीरमध्ये भारताचे सात लाख सैनिक तैनात केले आहेत. इतके सैनिक आमच्या संपूर्ण पाकिस्तानच्या सैन्यात आहेत. परंतु त्यांना हे माहित नाही की त्या ७ लाख सैनिकांच्या मागे आणखी २२-२३ कोटी सैन्य आहे आणि आम्ही आमच्या पाकिस्तानी सैन्यासोबत आहोत असं शाहीद आफ्रिदी म्हणाला होता.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
शाहिद आफ्रिदी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यावर गौतम गंभीर म्हणतो...
खासगी लॅबमधील कोरोना चाचणीचे दर ५० टक्क्यांनी कमी; राज्य सरकारचा मोठा निर्णय
चिंताजनक! राज्यातील १ कोटी ६६ लाख विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहणार?
राज्य सरकारनं सत्य सांगावं, सर्वसामान्यांना त्रास होतोय; भाजपा खासदाराचा गंभीर आरोप
हिंद महासागरात वेगाने पसरतोय ड्रॅगन; येणाऱ्या काळात भारतासाठी मोठं टेन्शन!
कोरोनापाठोपाठ चीनवर कोसळलं नवं संकट; लाखो लोकांचा जीव धोक्यात तर अनेक जण बेपत्ता!