ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पद्मविभूषण जाहीर झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. शरद पवार यांना पद्मविभूषण देण्याचे धाडस केल्याबाबत मोदींना भारतरत्न मिळायला हवा, असा टोला केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना हाणला आहे.
यासंदर्भात त्यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत, देशाला हुकूमशाही शक्तींपासून वाचवण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान मोदींना टार्गेट केले.
2014 मधील लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस 'नॅचरल करप्ट पार्टी' असल्याची टीका केली होती. तसंच राष्ट्रवादीचा उल्लेख भ्रष्टाचारवादी पार्टी असादेखील केला होता. तरीही त्याच पक्षातील नेत्याला पद्मविभूषण कसा दिला गेला, असा प्रश्नही 'आप'च्या नेत्यांनी उपस्थित केला आहे.
शरद पवार को पद्म विभूषण देने की हिम्मत दिखाने के लिए मोदी जी को भारत रत्न मिलना चाहिए https://t.co/z1417VKBcB— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) 26 January 2017
गणतंत्र दिवस के एक दिन पहले, कल मोदी जी ने CBI भेज कर दिल्ली सरकार के फ़ीड्बैक यूनिट की सारी फ़ाइल ज़ब्त कर लीं।— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) 26 January 2017