मनपाची सुरक्षा वार्यावर दुर्लक्ष : चार वर्षापासून सीसीटीव्ही बंद स्थितीत
By admin | Published: December 20, 2015 12:51 AM
जळगाव : महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत बसविण्यात आलेले १६ सीसीटीव्ही कॅमेर बंद स्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मनपाची सुरक्षा यंत्रणा वार्यावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
जळगाव : महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत बसविण्यात आलेले १६ सीसीटीव्ही कॅमेर बंद स्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मनपाची सुरक्षा यंत्रणा वार्यावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मनपा प्रशासनाने २००९ साली प्रशासकीय इमारतीत कॅमेरे बसविण्यासाठी शुवर टेक एजन्सी या कंपनीला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा मक्ता देण्यात आला होता. परंतु, दोनच वर्षात एक एक करून १६ कॅमेरे बंद पडले आहेत. या संपूर्ण कॅमेर्यांचे लिंकिंग (कंट्रोलर) ज्या संगणकात आहे. ते संगणकही गेल्या काही दिवसांपासून धूळखात पडले आहे. मक्तेदाराला एक रुपयाही दिला नाही महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत कॅमेरे बसविण्यासाठी सुमारे ४ लाख रुपयांचा खर्च आला आहे. मात्र, मक्ता देण्यापूर्वी मनपा प्रशासनाने ज्या अटी-शर्ती दिल्या होत्या. त्यानुसार काही कागदपत्रांची पूर्तता मक्तेदाराने केलेली नाही. त्यामुळे सहा वर्षात मक्तेदाराला एक रुपयाही देण्यात आलेला नाही. स्मरणपत्र देऊनही उपयोग नाही मक्तेदाराने अटी-शर्तींची पूर्तता करावी, यासाठी लागणारे कागदपत्रे प्रशासनाकडे सादर करण्याचे मक्तेदाराला सूचित करण्यात आले होते. परंतु, दोनदा स्मरणपत्र देऊनही मक्तेदाराने प्रशासनाकडे येऊन पाठपुरावाही केलेला नसल्याची माहिती प्रशासनातील अधिकृत सूत्रांनी दिली आहे. अंतिम नोटीस देणार संबंधित मक्तेदार दाद देत नसल्यामुळे आता अंतरीम नोटीस मनपातर्फे दिली जाणार आहे. तरीही दाद दिली नाही, तर नव्याने निविदा काढून सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ववत सुरू केले जाणार आहेत. याबाबत टिपणीही तयार झाली असून ती मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात येणार आहे.