शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 4:48 PM

या कार्यक्रमामुळे राजस्थानच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल. पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे दिया कुमारी म्हणाल्या.

जयपूर : अनेक पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणजे राजस्थान. या राज्याची वेगळी अशी ओळख आहे. येथील इतिहास, हवेली, राजवाडे, किल्ले, खाद्यसंस्कृती आणि वाळवंट इत्यादी अनेक गोष्टी पर्यटकांना भुरळ घालतात. दरम्यान, येथील सरकारकडून पर्यटनाला चालणा देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. अशातच राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि पर्यटन, कला आणि संस्कृती तसेच पुरातत्व विभागाचे सरकारी सचिव रवी जैन यांच्या उपस्थितीत रविवारी (दि.२४) अल्बर्ट हॉलमध्ये आयफा उपाध्यक्ष सुरेश अय्यर आणि राजस्थान सरकारचे पर्यटन आयुक्त विजय पाल सिंह यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. 

या सामंजस्य करारांतर्गत ७ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत जयपूर येथे "IIFA25 सेलिब्रेशन" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यटनाला चालना देण्याच्या दूरदृष्टीनुसार राज्यात पर्यटन क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जयपूर येथे ७ ते ९ मार्च या कालावधीत "IIFA25 सेलिब्रेशन" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनी सांगितले. 

आयफा पुरस्कारामुळे राजस्थानमधील पर्यटनाला नक्कीच चालना मिळेल. या कार्यक्रमादरम्यान जयपूरमध्ये सुप्रसिद्ध बॉलीवूड स्टार आणि इतर चित्रपट क्षेत्रातील मान्यवर हे आमचे पाहुणे असतील. राजस्थान आणि जयपूरमध्ये सिने जगताशी संबंधित या सेलिब्रिटींचे स्वागत आम्ही करणार आहोत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजस्थानच्या अनोख्या संस्कृतीला आणि पर्यटनाला जागतिक पटलावर आणखी बळ मिळणार आहे, असे दिया कुमारी म्हणाल्या.

आयफा पुरस्कार रौप्य महोत्सव वर्षानिमित्त जयपूरमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची २५ गौरवशाली वर्षे साजरी करण्याचा सोहळा ऐतिहासिकरित्या आयोजित केला जाईल. आयफा पुरस्कार आणि उपक्रम तीन दिवस विविध विभागांमध्ये आयोजित केले जातील. या कार्यक्रमामुळे राजस्थानच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल. पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे दिया कुमारी म्हणाल्या. तसेच, याचा फायदा पर्यटनाशी संबंधित सर्व क्षेत्रांना होणार असल्याचेही दिया कुमारी यांनी सांगितले.

डेस्टिनेशन मार्केटिंगच्या संधी उपलब्ध होतील - रवी जैनजयपूरमध्ये ७ ते ९ मार्च २०२५ दरम्यान होणाऱ्या "IIFA25 सेलिब्रेशन्स" या तीन दिवसीय कार्यक्रमात अनेक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. यामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील मेगा अचिव्हर्स आणि यशस्वी लोकांना सन्मानित केले जाईल. या पुरस्कारांमुळे राज्यासाठी जागतिक ब्रँडिंग आणि डेस्टिनेशन मार्केटिंगच्या संधी उपलब्ध होतील. पर्यटन विभाग, राजस्थान सरकार आणि आयफा व्यवस्थापन यांच्यातील अनेक चर्चेनंतर जयपूरमध्ये "IIFA25 सेलिब्रेशन्स" आयोजित करण्याची योजना आखण्यात आली आहे, असे सरकारी सचिव रवी जैन यांनी सांगितले.

२०२५ मध्ये ही संधी जयपूरला मिळाली - सुरेश अय्यरमार्च २०२५ मध्ये जयपूरमध्ये या युनिक सिग्नेचर कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. आम्ही भारतीय चित्रपट उत्सव साजरा करू. आयफाची स्थापना २००० मध्ये झाली होती. आयफा दरवर्षी १४ वेगवेगळ्या देशांमध्ये आणि १८ वेगवेगळ्या भौगोलिक शहरांमध्ये आयोजित केला जातो. यावेळी जयपूर येथे होणारा कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण समारंभ मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. हा कार्यक्रम जागतिक स्तरावर पोहोचेल आणि राजस्थान राज्यासाठी पर्यटन, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रात संधी निर्माण करणारा ठरणार आहे. तसेच, २०२० मध्ये भारतात आयफा कार्यक्रमाचे आयोजन मुंबईत करण्यात आले होते आणि आता २०२५ मध्ये ही संधी जयपूरला मिळाली आहे, असे आयफाचे उपाध्यक्ष सुरेश अय्यर यांनी सांगितले.

आयफा सोहळ्याचे उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रणदरम्यान, २७ ते २९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत अबुधाबी येथील यास द्वीपवर आयोजित करण्यात आलेल्या आयफा पुरस्कार २०२४ साठी आयफा उपाध्यक्ष सुरेश अय्यर यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांना आमंत्रित केले आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानtourismपर्यटन