शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

अॅपच्या माध्यमातून IIT च्या विद्यार्थ्याने आधारचा डाटा केला हॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 8:37 PM

अॅपच्या माध्यमातून आयआयटी खरगपूरमधील एका विद्यार्थ्याने अनेकांची आधारकार्डावरील व्यक्तीगत माहिती मिळवल्याचे प्रकरण समोर आले आहे.

ठळक मुद्देआयआयटी खरगपूरमधील एका विद्यार्थ्याने अनेकांची आधारकार्डावरील व्यक्तीगत माहिती मिळवल्याचे प्रकरण समोर आले आहेआधार कार्डावरची खासगी माहिती मिळवणे हा सरकारी यंत्रणांसाठी एक धक्का आहे.

बंगळुरु, दि. 31 - अॅपच्या माध्यमातून आयआयटी खरगपूरमधील एका विद्यार्थ्याने अनेकांची आधारकार्डावरील व्यक्तीगत माहिती मिळवल्याचे प्रकरण समोर आले आहे. अभिनव श्रीवास्तव असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपर असलेल्या अभिनवने eKYC व्हेरीफिकेशन हे अॅप विकसित केले. त्या माध्यमातून त्याने आधार कार्डाचा डाटा मिळवल्याच्या त्याच्यावर आरोप आहे. 

तंत्रज्ञानाचा वापर करुन अशा प्रकारे आधार कार्डावरची खासगी माहिती मिळवणे हा सरकारी यंत्रणांसाठी एक धक्का आहे. अभिनव ज्या कंपनीसाठी काम करत होता त्यांच्यासाठी नव्हे तर, त्याने स्वत:च हे अॅप बनवले होते. श्रीवास्तवने अॅप बनवल्यानंतर त्याने ते गुगल प्ले स्टोरवर टाकले. जूनपर्यंत हे अॅप गुगल प्लेस्टोअरवर होते. 

यूआयडीएआयने अभिनववर जानेवारी ते 26 जुलै 2017 पर्यंत बेकायद पद्धतीने आधारचा डाटा मिळवल्याचा आरोप केला आहे. अभिनव श्रीवास्तवने क्वार्थ टेक्नोलॉजी ही स्टार्ट अप कंपनी सुरु केली होती. जी ओलाने मार्च 2016 मध्ये विकत घेतली. मोबाइल वॉलेट अॅप X-Pay साठी ओलाने क्वार्थ टेक्नोलॉजी ही कंपनी विकत घेतली. अभिनवने 2012 मध्येच क्वार्थ टेक्नोलॉजी ही कंपनी सुरु केली होती. यूआयडीएआयच्या तक्रारीनंतर बंगळुरु पोलिसांनी आधार कायद्याच्या कलम 37 आणि 38 अंतर्गत अभिनव विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अॅपच्या माध्यमातून आतापर्यंत किती जणांच्या आधार कार्डावरील माहितीची छाननी झाली ते आताच सांगता येणार नाही. हा टेक्निकल तपासाचाविषय असून, आता कुठे सुरुवात झाली आहे असे तपास अधिका-याने सांगितले. 

आता एसएमएसवर लिंक करा आधार आणि पॅन कार्ड

सध्या प्रत्येक गोष्ट ऑनलाइन करण्याकडे सगळ्यांचा भर असतो. पॅन कार्डपासून ते पासपोर्टपर्यंत सगळेच अर्ज ऑनलाइन भरले जातात. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून अनेक गोष्टी डिजीटल करण्याकडे भर दिला जातो आहे. आता सरकारकडून आणखी एक सोपा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आता फक्त एका मेसेजवर नागरिकांना आपले आधार कार्ड आणि पॅनकार्ड जोडून घेता येणार आहे. आयकर विभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे. विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया जास्त सोपी होण्यासाठी पॅनकार्ड आणि आधारकार्ड क्रमांकांची जोडणी उपयुक्त होणार आहे. पॅनकार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक करायला दोन्ही कार्डांवरील नावं सारखी असणं आवश्यक आहे. दोन्ही कार्ड जोडण्यासाठी नागरीकांनी  567678 किंवा 56161 या क्रमांकावर मेसेज करायचा आहे. याशिवाय नागरीकांना ऑनलाईनही आपल्या कागदपत्रांची जोडणी करुन घेता येणार आहे. आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाईटवरील लिंकवरुनही हे काम करता येणार आहे.

युनिक आयडेंटीफीकेशन ऑफ इंडियाकडून पॅन आणि आधार कार्ड लिंक झाल्याचं व्हेरीफीकेशन होईल. त्य़ानंतर ही जोडणी निश्चित होणार असल्याचं संबंधित यंत्रणेकडून सांगण्यात आलं आहे. आयकर विभागाकडून देण्यात येणारी ही सुविधा नागरीक आणि आयकर भरणाऱ्यांसाठी असणार आहे.सरकारच्या २०१७ मधील अर्थविषयक कायद्यानुसार कर भरणाऱ्याला आधार कार्ड सादर करणं बंधनकारक आहे. तसंच जुलै २०१७ पासून पॅन कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलं आहे. सुरक्षेच्यादृष्टीने आणि अर्थिक व्यवहारांमध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता यावी यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं महत्त्वाची ठरणार आहे.