शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

रोजगार गुणवत्तेमध्ये आयआयटीचा दर्जा खाली! क्यूएस रँकिंग; पहिल्या २00 संस्थांमध्ये फक्त मुंबई व दिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 1:09 AM

उच्च शिक्षण क्षेत्रातले प्रख्यात आंतरराष्ट्रीय नेटवर्क क्वेकेरली सायमंडस (क्यूएस) च्या ताज्या एम्प्लॉएबल रँकिंगमधे भारतातील ५ आयआयटी व १ आयआयसी तसेच दिल्ली विद्यापीठाच्या स्नातकांचा दर्जा गेल्या वर्षीच्या तुलनेत आणखी खाली गेला आहे. जगातल्या नोकरीलायक गुणवत्तेच्या पहिल्या २00 उच्च शिक्षण संस्थांमधे केवळ मुंबई आणि दिल्ली आयआयटीचा समावेश आहे.

- सुरेश भटेवरा नवी दिल्ली : उच्च शिक्षण क्षेत्रातले प्रख्यात आंतरराष्ट्रीय नेटवर्क क्वेकेरली सायमंडस (क्यूएस) च्या ताज्या एम्प्लॉएबल रँकिंगमधे भारतातील ५ आयआयटी व १ आयआयसी तसेच दिल्ली विद्यापीठाच्या स्नातकांचा दर्जा गेल्या वर्षीच्या तुलनेत आणखी खाली गेला आहे. जगातल्या नोकरीलायक गुणवत्तेच्या पहिल्या २00 उच्च शिक्षण संस्थांमधे केवळ मुंबई आणि दिल्ली आयआयटीचा समावेश आहे.गेल्या वर्षी या दोन आयआयटीचे रँकिंग पहिल्या १५0 संस्थांमधे होते. यंदा या कसोटीते या दोन्ही आयआयटी एक पायरी खाली आल्या आहेत. भारतात १00 पैकी फक्त ४0 इंजिनीअर्स नोकरीसाठी गुणवत्तेच्या लायकीचे आहेत, असे विधान मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले होते. आता ते प्रमाण आणखी खाली घसरले असावे.क्यूएसच्या ताज्या रँकिंग्जमधे आयआयटी खरगपूर व आयआयटी मद्रासचा समावेश गतवर्षी जगातल्या पहिल्या ८१ ते ९0 व १0१ ते २00 च्या दरम्यान होता. यंदाच्या रँकिंगमधे या दोन्ही संस्था २0१ ते २५१ मध्ये आहेत. म्हणजेच त्या मागे पडल्या आहेत. गतवर्षी आयआयटी कानपूर व दिल्ली विद्यापीठाचा समावेश २0१ ते २५0 प्रवर्गात होता. यंदा तो अनुक्रमे ३0१ ते ५00 व २0१ ते २५0 प्रवर्गात आहे. गेल्या वर्षी क्यूएस रँंकिंगमधे जगातल्या ३00 संस्थांचा समावेश होता. त्यामुळे मुंबई विद्यापीठ व आयआयसी (बंगळुरू) त्यात नव्हते. जागतिक स्तरावर स्नातकांची नोकरीलायक गुणवत्ता, नोकरीची शक्यता तसेच उच्च शिक्षण संस्था व विद्यापीठांच्या यशाची तुलना करून उपयुक्त मानदंडानुसार क्यूएस ग्रॅज्युएट एम्प्लॉयबिलिटी रँकिंग्ज तयार केले जातात. यंदाच्या रँकिंग्जमधे अ‍ॅल्युमिनी आऊ टकम इंडिकेटरच्या प्रतिक्षेत २५ टक्के तर एम्प्लॉयर स्टुडंटस कनेक्शन रेशोमध्ये १0 टक्के घट आहे. तसेच क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅकिंग्जमधे एम्प्लॉयर रेप्युटेशन इंडेक्स २0१८ च्या बदलांनाही दर्शवण्यात आले आहे.मुंबई विद्यापीठ मागेचयंदाच्या क्यूएस रँकिंगमधे जगातल्या ४९५ संस्थांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन असल्याने मुंबई विद्यापीठाचा २0१ ते २५0 प्रवर्गात तर आयआयसी बंगळुरूचा ३0१ ते ५00 प्रवर्गात समावेश आहे. 

टॅग्स :Indiaभारत