शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

Coronavirus: येत्या ३० दिवसांत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या साडेपाच लाखांपर्यंत पोहचू शकते – रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 7:07 AM

हे नवीन मॉडेल नुकतेच देशात संक्रमणाचा अंदाज लावण्यासाठी वापरल्या जाणार्‍या तीनही मॉडेल्सच्या मदतीने तयार केले गेले आहे.

ठळक मुद्देआयआयटी गुवाहाटी आणि सिंगापूरच्या ड्यूक मेडिकल स्कूलचा अहवाल नवीन मॉडेलअंतर्गत देशातील राज्ये तीन प्रकारात विभागली गेली आहेत.घातांकीय, लॉजिस्टिक आणि ससेप्टबल इन्फेक्शस ससेप्टबल (एसआयएस) मॉडेल वापरली गेली

नवी दिल्ली – देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत ६२ हजारांहून जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे तर २ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाशी लढण्यासाठी देशातील अनेक संशोधन संस्था विविध तंत्रज्ञानावर काम करत आहेत. अशातच गुवाहाटीमधील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी यांनी सिंगापूरच्या ड्यूक एनयूएस मेडिकल स्कूलसोबत संयुक्तरित्या देशातील पुढील ३० दिवसात कोरोना संक्रमण किती प्रमाणात वाढेल याचा अंदाज दिला आहे.

हे नवीन मॉडेल नुकतेच देशात संक्रमणाचा अंदाज लावण्यासाठी वापरल्या जाणार्‍या तीनही मॉडेल्सच्या मदतीने तयार केले गेले आहे. या मॉडेल अंतर्गत देशातील राज्ये तीन प्रकारात विभागली गेली आहेत. हे वर्गीकरण सध्याच्या रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनपेक्षा वेगळे आहे. त्याच्या संशोधनानुसार, येत्या ३० दिवसांत भारतात दीड लाख ते साडे पाच लाख कोरोनाग्रस्त आढळू शकतात. डेटा सायन्स मॉडेलवरून केलेल्या विश्लेषणानुसार ही आकडेवारी दीड लाखांपर्यंत गेली आहे. त्याचबरोबर लॉजिस्टिक पद्धतीने देशात साडे पाच लाख कोरोना रुग्णांची संख्या होऊ शकते.

आयआयटी गुवाहाटीचे सहाय्यक प्राध्यापक पलाश घोष म्हणाले की, कोणत्याही एका मॉडेलने केलेला अंदाज योग्य होणार नाही. हे लक्षात घेऊन आम्ही तिन्ही मॉडेल्स एकाच वेळी वापरली आहेत. यासह, या मॉडेलमध्ये फ्री डेली इन्फेक्शन रेटचा देखील प्रयोग केला आहे. रविवारी देशात कोरोनामुळे मृत्यूची संख्या २ हजार १०९ झाली आहे तर कोरोनाग्रस्तांची संख्या ६२ हजार ९३९ पर्यंत पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, गेल्या २४ तासांत १२८ लोकांचा मृत्यू झाला तर ३ हजार २७७ रुग्ण आढळले आहेत.

या संशोधनाशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की कोणत्याही एका मॉडेलवर आधारित अहवाल आपल्याला दिशाभूल करू शकतो. त्यामुळे ही शक्यता दूर करण्यासाठी घातांकीय, लॉजिस्टिक आणि ससेप्टबल इन्फेक्शस ससेप्टबल  (एसआयएस) मॉडेल वापरली गेली आहेत. याशिवाय ओपन सोर्स डेटाचा वापर करून रोज इन्फेक्शन रेट काढला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या