खरगपूर : पुनर्वापर होण्यायोग्य कचरा विकणे आता खरगपूरवासीयांसाठी फोनवर पिझ्झाची आॅर्डर देण्याएवढे सोपे झाले आहे. आयआयटी खरगपूरच्या सामाजिक उद्यमी गटाने ‘कबाडी आॅन कॉल’ ही सेवा सुरू करीत घरोघरचा कचरा विकत घेण्याचा अभिनव प्रकल्प सुरू केला आहे.दिलेल्या फोननंबरवर कॉल करून कचरा गोळा करणाऱ्या ट्रकची वेळ निश्चित केली की काम झाले. पीएचडीचे विद्यार्थी अभिमन्यू कार आणि त्यांच्या मित्रांनी ‘गेनवेस्ट’ हा गट स्थापन करून घनकचऱ्याचे सर्वंकष व्यवस्थापन आणि पुनर्वापर सेवा सुरू केली आहे. विद्यापीठ परिसरात स्वच्छता, आरोग्य आणि सौंदर्य राखण्यासाठी पर्यावरणपूरक उपाय करणे गरजेचे होते. यातून ही संकल्पना पुढे आली आहे. आयआयटी खरगपूरमध्ये अशा प्रकारचे उपक्रम नियमित राबविण्यात येतात. कचऱ्याशी संबंधित उपक्रम त्याचाच एक भाग आहे, असे स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रा. अनिर धर यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)प्लास्टिकच नव्हे तर पेपरपासून बाटलीपर्यंत कोणताही घन कचरा चालतो. तो आम्ही जुजबी नफा कमावत घाऊक विक्रेत्याला विकतोे. २०१४ पासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत दरमहा २० हजार रुपये मिळतात. आम्ही मजुरांकडून कचरा गोळा करण्याचे काम करतो. विशेष म्हणजे डिजिटल मशीनवर कचरा मोजला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या कचऱ्याचे रेट कार्ड ठरले असून त्यानुसार किंमत दिली जाते, असे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने सांगितले.
आयआयटीचे विद्यार्थी गोळा करतात कचरा
By admin | Published: March 09, 2016 4:59 AM